साक्षीदार | १ नोव्हेबर २०२३ | भुसावळ शहरात मॉर्निंग वॉक करत असताना भरधाव ट्रकने धडक दिल्याने ५२ वर्षीय इसमाचा जागीच मृत्यूब झाल्याची घटना दि.३१ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान भुसावळ शहरातील रेल्वेच्या उड्डाणपुलाजवळ घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सिंधी कॉलनीमधील रहिवासी अशोक बखटमल बजाज (५२) हे नियमित सकाळच्या सुमारास मॉर्निंग वॉक करण्यासाठी जात असतात दि.३१ ऑक्टोबर रोजी देखील ते रेल्वे उड्डाणपुलानजीक गेले असता ट्रकने (एमएच १८ बीजी ७/२४) त्यांना पाठीमागन जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. अपघात प्रकरणी बाजारपेठ पोलिसात रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला. ट्रक चालक युनूस शहा, सजन शहा फकीर (रा. धुळे) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक मंगेश बेनकोळी करत आहे.