२ कोटीचा ऐवज चोरणाऱ्याला रावेरमधून अटक !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | १८ नोव्हेबर २०२३ | बंगळुरू येथून तब्बल साडेपाच किलो सोने तसेच ६ लाखांची रक्कम असा २ कोटी ७८ लाखांचा ऐवज चोरणाऱ्या एकास गोरखपूर एक्स्प्रेसमधून अटक करण्यात आली. गुरुवारी रात्री ११ वाजता रावेर रेल्वे स्थानकावर ही धडक कारवाई करण्यात आली.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रसह गुजरात, तेलंगणा, कर्नाटकासह विविध प्रांतांमध्ये तब्बल दहा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेला उपेंद्र प्रदीप शाही (३५, रा. पंनथुर, मेन रोड, शोभा ड्रीम इकर, बंगळुरू, कर्नाटक) असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपीच्या ताब्यातून १४ हजारांची रोख रक्कम आणि ३ हजार ९०० नेपाळी चलनाच्या नोटा जप्त करण्यात आल्या. आरोपी हा गोरखपूर एक्स्प्रेसने (गाडी क्र. ११०७९) पळून जात असल्याची माहिती भुसावळ मंडल सुरक्षा आयुक्त श्रीनिवास यांना मिळाली.

आरपीएफ पीआय आर. के. मीना, उपनिरीक्षक के. आर. तर्ड, एन. के. सिंह, सुभाष राजपूत, महेंद्र कुशवाह, आर. के. एस. वसावे, विनोदकुमार वर्मा यांनी गाडीत आरोपीचा शोध घेतला. ही गाडी गुरुवारी रात्री ११ वाजता रावेर रेल्वे स्थानकावर आली असता एस-१ कोचमधून या आरोपीला अटक करण्यात आली.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

Heart Attack | धक्कादायक! धावत्या दुचाकीवरच तरुणाचा मृत्यू; हृदयविकाराचा...

Heart Attack यावल | मिलिंद जंजाळे | यावल शहरातील अंकलेश्वर–बऱ्हाणपूर राज्य मार्गावरील चोपडा नाक्याजवळ एका ३२ वर्षीय तरुणाचा धावत्या दुचाकीवर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने...

RECENT NEWS