भरधाव चारचाकीच्या धडकेत रिक्षाचा अपघात : जागीच एक ठार !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | १२ ऑक्टोबर २०२३| जळगाव शहरापासून जवळ असलेल्या नशिराबाद गावाजवळील मुंजोबा मंदिराजवळील उड्डाणपुलावर बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास रिक्षात कलर घेवून मोताळा येथे जात असलेल्या रिक्षाला मागून भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने धडक दिली. धडक इतकी जोरात होती की पुढे चालणारी रिक्षा उलटून रिक्षातील प्रवासी महिला आस्माबी शेख मंजूर (वय ३०, रा. बोरखेडी ता. मोताळा, जि. बुलढाणा) या जागीच ठार झाल्या. तर त्यांच्यासोबत असलेले चार प्रवासी गंभीर जखमी झाले.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, जळगावकडून (एमएच १९ बीयू ५८४३ ) क्रमांकाच्या प्रवासी रिक्षातून प्रवासी कलर घेवून बुधवारी सायंकाळच्या सुमारास भुसावळकडे जात होते. याचवेळी मागून भरधाव वेगाने जाणाऱ्या (एमएच १९ इए ५१०९) क्रमांकाच्या कारने रिक्षाला मागून जोरदार धडक दिली. ही घटना नशिराबाद गावाजवळील मुंजोबा मंदिराजवळील उड्डाणपुलावर घडली. कारने दिलेली धडक इतकी जोरात होती की, रिक्षा उलटून रिक्षातील प्रवासी महिला आस्माबी शेख मंजूर यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना लागलीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर त्यांच्यासोबत असलेली इतर चौघे प्रवासी गंभीर जखमी झाले होते. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांसह नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्र्वर मोताळे, सहाय्यक फौजदार हरिष पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तात्काळ उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले.

या अपघातात रिक्षातील जुबेर शेख मेहबुब शेख (वय ४०), करीम बेग शरीफ बेग (वय २९), शेख सादीक शेख इसार (४०) व शेख उमेमा शेख जुबेर (वय ६) हे चौघेजण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर गोदावरी हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS