back to top
गुरूवार, ऑगस्ट 21, 2025

लाखो व्हॉट्सअॅपधारकांना झटका ‘हे’ खाती झाली बंद !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

साक्षीदार | ३ नोव्हेबर २०२३ | सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात वापरण्यात येत असलेले व्हॉट्सअॅप आता अनेकांच्या मोबाईलमधून गायब झाल्याची बातमी समोर आली आहे. ‘मेटा’ कंपनीचे मालकत्व असलेल्या व्हॉट्सअॅपने माहिती-तंत्रज्ञान (आयटी) नियमांचे पालन करीत गेल्या सप्टेंबर महिन्यात तब्बल ७१.१ लाख भारतीय खाती बंद केली आहेत. याबाबत लोकप्रिय सोशल मीडिया व्हॉट्सअॅपने भारताच्या संदर्भातील मासिक अहवालातून गुरुवारी खुलासा केला आहे. भारतीय व्हॉट्सअॅपची खाती ‘ + ९१’ क्रमांकावरून ओळखली जातात, हे विशेष.

- Advertisement -

व्हॉट्सअॅपने ‘युजर्स सुरक्षा’ या शीर्षकाखाली सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे की, १ ते ३० सप्टेंबर २०२३ दरम्यान ७१ लाख १० हजार खाती बंद करण्यात आली आहेत. यापैकी भारतातील सुमारे २५.७ लाख व्हॉट्सअॅप युजर्सनी कोणताही प्रतिसाद देण्यापूर्वीच त्यांची सक्रिय खाती बंद करण्यात आली आहेत. वापरकर्त्याकडून मिळालेल्या तक्रारींचा तपशील, व्हॉट्सॲपद्वारे केलेली संबंधित कारवाई, तसेच प्लॅटफॉर्मवरील गैरवर्तनाचा सामना करण्यासाठीच्या नियमानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. मागील १ ते ३० सप्टेंबरदरम्यान व्हॉट्सअॅपच्या तक्रार अपील समितीने ६ आदेश पारित केले. त्याची अंमलबजावणी केल्याचे सूत्रांनी सांगितले. तत्पूर्वी ऑगस्ट महिन्यात ७४ लाख व्हॉट्सअॅप खाती बंद करण्यात आली. यापैकी ३५ लाख खाती सक्रियरीत्या बंद करण्यात आली. व्हॉट्सअॅपने आपल्या ताज्या अहवालात म्हटले आहे की, सप्टेंबरमध्ये युजर्स समर्थन (१,०३१), बॅन अपील (७, ३९६ ) इतर समर्थन (१,५१८), उत्पादन समर्थन ( ३७०) आणि सुरक्षितता (१२७), असे एकूण १०,४४२ युजर्सचे अहवाल मिळाले. त्याआधारे ८५ खात्यांवर कारवाई करण्यात आली. दरम्यान, ‘अकाऊंट्स अॅक्शनड’ वरून अहवालाच्या आधारे कारवाई केल्याचे स्पष्ट झाले आहे. असे पाऊल उचलणे म्हणजे एखाद्या खात्यावर बंदी घालणे किंवा तक्रारीचा परिणाम म्हणून पूर्वी बंद केलेली खाती पुनर्संचयित करणे होय, असे व्हॉट्सअॅपच्या सूत्रांनी सांगितले.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Fadnavis Support Pawar, Thackeray | फडणवीसांचा पवार-ठाकरेंना फोन, राजकीय...

Fadnavis Support Pawar, Thackeray | साक्षीदार न्यूज | जगदीप धनकड यांनी अचानक राजीनामा दिल्याने उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक 9 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी...

Big News Ration Card | केंद्राचा मोठा निर्णय: 1.17...

Big News Ration Card | साक्षीदार न्यूज  | केंद्र सरकारने राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA) स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 1.17 कोटी रेशनकार्डधारकांना...

Domestic Violence | यावल येथे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार; पाच...

Domestic Violence | साक्षीदार न्यूज | यावल येथील पोलीस ठाण्यात एका महिलेने आपले पती, सासू, जेठ, जेठाणी आणि नणंद यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठी...

RECENT NEWS