साक्षीदार | २३ ऑक्टोबर २०२३ | भुसावळ शहरातील एका २३ वर्षीय तरुणीला लग्न करण्याचे आमिष दाखवून ४ महिने अत्याचार करण्यात आला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने बाजारपेठ पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदवल्यानंतर संशयित उमेश शेख मोहसीन शेख (२५) रा. ताजनगर भुसावळ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका परिसरात २३ वर्षीय पीडिता वास्तव्यास असून उमेश शेख मोहसीन शेख सोबत तिची ओळख झाल्यानंतर संशयिताने तिला लग्न करण्याचे आमिष दाखवले व ७ नोव्हेंबर २०२२ ते २६ फेब्रुवारी २०२३ दरम्यान स्वतःच्या घरी तिच्यावर अत्याचार केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित तरुणीने शनिवारी सायंकाळी बाजारपेठ पोलिस ठाणे गाठत तक्रार दिल्यावरून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजू सांगळे करीत आहेत