Rajasthani community ; सकल राजस्थानी समाजाच्या विधवा-विधुर, अपंग, घटस्फोटीतांचा जालना येथे राज्यस्तरीय परिचय मेळावा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Rajasthani community पुनःर्विवाह इच्छुकांनी 15 ऑगस्टपर्यंत नाव नोंदणी करावी – हस्तीमल बंब

साक्षीदार न्युज ; – सकल राजस्थानी मारवाडी समाजाच्या (जैन, अग्रवाल, माहेश्वरी इ.) पुनःर्विवाह इच्छुक विधवा-विधुर, अपंग, घटस्फोटितांचा राज्यस्तरीय परिचय मेळावा येत्या 25 ऑगस्ट 2024 रविवार रोजी जैन भवन, सकलेचा नगर, भोकरदन रोड, जालना येथे आयोजित करण्यात आला आहे, याबाबतची माहिती हस्तीमलजी बंब यांनी काल दि. 21 जुलै रोजी श्री कानजी शिवजी ओसवाल बोर्डिंग जळगाव येथे घेतलेल्या समाज प्रतिनिधिंच्या बैठकीत दिली.

- Advertisement -

आजच्या धावपळीच्या जीवनात तणावपुर्ण वातावरणात, पाश्चात्य शैली, हायब्रीड खान-पान, व्यसनाधिनतेमुळे तरुणांना सुध्दा अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. ट्राफिकमुळे अपघात, घटना-दुर्घटना वाढत चाललेल्या आहेत. त्यामुळे कमी वयात विधवा-विधुरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे शिक्षणात मोठ्या प्रमाणात प्रगती होतांना दिसत आहे, मात्र दुसरीकडे तरुण-तरुणीमध्ये कौटुंबिक कारणामुळे घटस्फोट ही समाजामध्ये भयंकर समस्या उभी राहात आहे. तसेच अपंग, विकलांग अशा दिनदुःखी उमेदवारांचे नाते जुळवणे व ते टिकवणे, निभावणे जिकरीचे झाले आहे. तरुण-तरुणीमध्ये अनैतिकता वाढत आहे. ते थांबविण्यासाठी देशभर हा उपक्रम राबविले जात असल्याचे श्री बंब यांनी सांगितले. महाराष्ट्रात राज्यस्तरीय मेळावा येत्या 25 आगस्ट रोजी जालना येथे संपन्न होतं आहे त्यासाठी 15 आगस्टपर्यंत इच्छुक उमेदवारांनी नावं नोंदणी करायची आहे. जळगांव जिल्ह्यासाठी दिलीप हस्तीमलजी चोपडा यांच्या नेतृत्वात स्वरूप लुंकड, श्रेयस कुमट, अनिल चोरडिया, महेंद्र जैन, किशोर अग्रवाल, महेश दायमा, सीताराम पुरोहित, कैलास प्रजापत, विजय झांबड, ललित शर्मा, राजेंद्र शर्मा, हंसराज पांडे, किशोर डेरेकर, जेष्ठ पत्रकार धन्यकुमार जैन या समाज बांधवांची समिती गठीत करण्यात आली आहे.

या मेळाव्यात राज्यभरातील शेकडो उमेदवारांना एकाच मंचावर नाते जुळविण्याची संधी मिळणार आहे, शिवाय वेळ व अनावश्यक खर्च टाळण्यास मदत होणार आहे. यामेळाव्यात उमेदवारासोबत एका पालकाला प्रवेश देण्यात येईल. सहभागी वधु-वरांची संपुर्ण माहिती पुस्तिका प्रकाशित करण्यात येणार आहे. विखुरलेल्या कुटूंबाना परत जोडण्याचा हा प्रयास आहे. परिचय मेळावा ही काळाची गरज आहे. समाजातील वेगवेगळ्या पंथाना एकजुट करणे, संघटीत करणे सर्वांना एकाच मंचावर आणणे यासाठी हा मेळावा एक माध्यम आहे. या मेळाव्याचा प्रचार-प्रसार, जनजागृति व नोंदणी करण्यासाठी राज्यस्तरीय संपर्क दौरा करण्यात येत आहे. पुनःर्विवाह इच्छुकांनी, त्यांच्या पालकांनी 15 ऑगस्टपर्यंत 9422219068 या व्हॉटस्अप नंबरवर प्रवेश अर्ज पाठवावे. असे आवाहन श्री बंब यांनी केले आहे.

Rajasthani community

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS