back to top
शुक्रवार, सप्टेंबर 26, 2025

अनुसूचित जाती जमाती अत्याचार विरोधी संघर्ष समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

साक्षीदार न्युज ; – सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती जमातीचे वर्गीकरण करून त्यास क्रिमिलेयरची मर्यादा लावून आरक्षण देण्याबाबत दिलेल्या निर्णयास स्थगिती देणे संदर्भात अनुसूचित जाती जमाती अत्याचार विरोधी संघर्ष समिती जळगाव जिल्हा तर्फे मा.राष्ट्रपती यांच्या नावे मा. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देण्यात आले.

- Advertisement -

या निवेदनात सर्वोच्च न्यायालयातून सात सदस्य खंडपीठाने अनुसूचित जाती जमातीचे वर्गीकरण करून अनुसूचित जातीस क्रिमिलियर ची अट लावून आरक्षण निश्चित करणे बाबतचा दिलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा पूर्ण आदर बाळगून या निर्णयाला स्थगिती देण्यासंदर्भात जळगाव जिल्हा अनुसूचित जाती, जमाती अत्याचार विरोधी संघर्ष समितीच्या वतीने सविस्तर निवेदन देण्यात आले संविधान सभेने अनुसूचित जाती-जमातीचे आरक्षण दिलेले आहे ते या समाजाच्या आर्थिक मागासलेपणावरून दिलेले नाही तर हजारो वर्षा पासून त्यांना वंचित ठेवण्यात आलेले असल्याने ते आरक्षण संविधानाने दिलेले आहे त्यांचे लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जातीस पंधरा टक्के तर अनुसूचित जमाती 7.5% आरक्षण दिलेले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने संविधान सभेच्या निर्णयात तसेच घटनात्मक तरतुदीस धक्का बसला असून स्वतंत्र भारताच्या 75 वर्षातील अनुसूचित जाती जमातीचे शैक्षणिक मागासलेपण मोठ्या प्रमाणावर आजही आहे शिक्षणाशिवाय नोकरी व अन्य शासकीय सवलती मिळत नसल्याने अनुसूचित जाती जमातीतील एक मोठा वर्ग आपोआप आरक्षणाला मुकणार आहे वर्गवारी करताना अनेक जात समूहाची अत्यल्प लोकसंख्या असल्याने आरक्षणाचा टक्का सुद्धा निघणार नाही तेव्हा अशा अल्प समुदायाचा स्वतंत्र एक गट करणे भाग पडेल असे स्वतंत्र गट जरी झाले तरी त्या प्रगत अप्रगत घटक राहणारच आहेत.

तेव्हा अशा वर्गवारीस काहीच अर्थ उरणार नसल्याने उलट जाती जातीत वैमनस्य वाढवून आत्ताची त्याच्यातील एकता भंग पावणार असल्याचे निवेदनात म्हटले गेले आहे मा. जिल्हाधिकारी यांना अनुसूचित जाती जमाती अत्याचार विरोधी संघर्ष समितीतील मुकुंद सपकाळे, जयसिंग वाघ, डॉ. मिलिंद बागुल, विजयकुमार मौर्य, डी. एम.अडकमोल, प्रा. प्रीतीलाल परिहार, हरिश्चंद्र सोनवणे, भाऊराव इंगळे, राजू मोरे, रमेश सोनवणे, रमेश बहारे, सतीश गायकवाड, चंदन बिऱ्हाडे, सोमा भालेराव, अजय बिऱ्हाडे,अनिल सुरडकर ,आकाश सपकाळे, जगदीश सपकाळे, जयपाल धुरंदर, दिलीप सपकाळे, महेंद्र केदारे, गोपाळ भालेराव, चंद्रकांत भालेराव, अमोल कोल्हे, आदी मान्यवर निवेदन देताना उपस्थित होते.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Heavy Rain | “मुसळधार पावसाने घेतले 84 जीव! मृतांच्या...

Heavy Rain | साक्षीदार न्यूज | राज्यात अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर मानवहानी आणि संपत्तीचे नुकसान झाले असून, शासनाने तत्काळ मदतकार्य सुरू केले आहे....

Pandit Deendayal Upadhyay | पंडीत दीनदयाल उपाध्याय जयंती निमित्त...

Pandit Deendayal Upadhyay | साक्षीदार न्यूज | भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत महत्त्वाचा वाटा असणारे, एकात्मवाद व अंत्योदय विचारांचे प्रणेते "स्व.पंडित दीनदयाल उपाध्याय" यांच्या जयंती निमित्त...

Agriculture Officer | “शेतकऱ्यांचे संसार पाण्यात, मात्र कृषी अधिकारी...

Agriculture Officer | सुनिल भोळे | जळगाव जिल्ह्यात अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतीतील उभी पिके पाण्याखाली गेली, अनेकांच्या घरांचे नुकसान...

RECENT NEWS