साक्षीदार | २१ नोव्हेबर २०२३ | रावेर शहरात कामानिमित्त आलेल्या सफाई कामगाराचा हृदयविकाराने मृत्यू झाला. भुसावळ न.पा.चे निवृत्त सफाई कामगार मनोज किसन बोयत (वय ५५, रा. रसलपूर रोड, रावेर, ह. मु. वाल्मीकनगर, भुसावळ) हे येथील स्टेट बँकेच्या शाखेतील खाते स्थलांतरित करण्याचा अर्ज भरण्यासाठी जुन्या तहसील कचेरीसमोरील वेंडरकडे उभे असताना जागीच मूर्च्छित होऊन कोसळले यातच त्यांचा मृत्यू झाला.
ही घटना २० नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. यासंबंधी वेंडर इस्माईल परबत तडवी यांनी दिलेल्या खबरीवरून रावेर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभांगी चौधरी यांनी शवविच्छेदन केले असता हृदयविकाराने निधन झाले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.