दोन दुचाकीचा भीषण अपघात : एक जागीच ठार तर दोन गंभीर !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | २३ ऑक्टोबर २०२३ | चोपडा-यावल रस्त्यावरील नारद-खरद फाट्याजवळ गजानन वेफर्स या दुकानाजवळ दि. २२ रोजी सायंकाळी ६:३० वाजेदरम्यान दोन दुचाकींचा विचित्र अपघात होऊन त्यात एकजण जागीच ठार झाला असून दोन जखमी आहेत.जखमींवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील नारद येथील रहिवासी असून गावातील जितेंद्र रामलाल पाटील यांच्याकडे सालदार म्हणून काम करीत असलेले मयत ताराचंद मोकड्या बारेला (२३) तालुक्यातील रस्त्यांच्या खड्यांनी आणखी एक बळी घेतला आहे. जाकेश कमलसिंग पावरा (३५) रामदयाल गौतम (२५, रा. जळगाव) हे दालमिलमध्ये काम करतात. ते दुचाकीने जळगाव जात होते. मयत ताराचंद हा नारद येथे जात असता मागून येणाऱ्या दोघांच्या दुचाकीने खड्डे वाचविण्याच्या प्रयत्नात पुढच्या गाडीला मागून धडक दिली. अपघात इतका भयंकर होता की, यात ताराचंद माकड्या बारेला हा जागीच ठार झाला. नितीन निकम (माचले), डॉ. भरत धनगर (वडती) आणि रस्त्यांवरील वाहतूक करणाऱ्या लोकांनी मदतकार्य करत उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS