साक्षीदार न्युज ; – दोन वर्षांपासून वाळूचा कोणताही ठेका झालेला नाही .परंतु शहरात असे एकही बांधकाम नाही कि ज्याला वाळू अभावी बांधकाम बंद झाले असे एकही बांधकाम नाही .कारण शहरात अगदी सहज वाळू पाहिजे त्या ठिकाणी प्रशासनाच्या मदतीने पाहिजे तितकी मिळत आहे . हि वाळू चोरी करीत असतांना सर्व काही सांभाळावे देखील लागते म्हणजे प्रत्येक भागातील सर्वच विभागाचा आशीर्वाद घ्यावा लागतो तरच हा वाळू चोरीचा व्यवसाय करता येऊ शकतो. वाळू चोरी करीत असतांना ठराविकच वाहन हे पकडले देखील जाते . कारण कारवाई देखील दाखविणे गरजेचे असते . मात्र अनेक वेळा वाहन हे पकडल्या नंतर जमा करण्यासाठी जात असते मात्र ते ठरल्या ठिकाणी पोहचतच नाही ते मध्येच अचानक गायब होते .
याबाबत सविस्तर माहिती अशी कि , मेहरूण भागात दिनांक अशोक किराणा जवळ दिनांक १७ रोजी दुपारी दोन कर्मचाऱयांनी वाळूने भरलेले ट्रॅक्टर पकडले होते आणि ते ट्रॅक्टर हे जमा करण्यासाठी नेण्यात आले . मात्र हे ट्रॅक्टर कार्यालयाजवळ पोहचले मात्र तेथून ते ट्रॅक्टर हे सोडून देण्यात आले . ह्या दोन कर्मचाऱयांच्या परवानगी शिवाय तुम्ही वाळूचा व्यवसाय करू शकत नाही आणि हे कर्मचारी ज्या ठिकाणी बांधकाम सुरु आहे त्याठिकाणी वाळू पडलेली असते त्या ठिकाणी जाऊन संबंधित बांधकाम मालकाला वाळू कोठून आणली आणि कुणी टाकली त्या बद्दल माहिती विचारली जाते आणि त्या वाळू टाकणाऱ्या जाब विचारला जातो कि तू वाळू कुणाला विचारून टाकली . ह्या दोघेही कर्मचार्याकडे त्यांचे पर्सनल मोबाईल नंबर देखील असल्याचे बोलले जात आहे . त्यावरूनच ह्या दोघांचे बोलणे सुरु असते .