जयश्रीताईंसाठी एकवटली नारी शक्ती; हुडकोतील कॉर्नर सभेस प्रचंड प्रतिसाद

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

जळगाव (सुनील भोळे ) : – शहरातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने आता चांगलाच जोर धरला आहे. दरम्यान काल (दि.६) दुपारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या व महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्री महाजन यांच्या प्रचार रॅलीत उत्स्फूर्तपणे सहभागी होत महिलांनी जयश्री महाजन यांना नारीशक्तीचा भक्कम पाठिंबा असल्याचे दर्शवून दिले.

- Advertisement -

corner meeting in Hudko

दुपारच्या सत्रात शहरातील प्रभाग क्र. १० मधील खंडेराव नगर, आझानगर या भागातून निघालेल्या प्रचार रॅलीत परिसरातील असंख्य महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत, जयश्री महाजन यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत, “जयश्रीताई तुम आगे बढो”च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. ठिकठिकाणी महिलांनी जयश्री महाजन यांचे स्वागत केले व शहराच्या नेतृत्वाकडून असलेल्या आशा-अपेक्षांचा पाढा जयश्री महाजन यांच्या समोर मांडला. त्यांच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधत जयश्री महाजन यांनी त्यांना आपला विकासात्मक दृष्टिकोन सांगितला. प्रचार रॅलीत सहभागी झालेल्या तसेच परिसरातील नारीशक्तीने अनेक वर्षानंतर शहराचे नेतृत्व महिलेला देण्याचा निर्धार करत मशाल चिन्हालाच मत देणार असल्याचे वचन यावेळी दिले. नारीशक्तीच्या प्रचंड उपस्थितीने प्रचार रॅलीचे स्वरुपच बदलवून टाकले.

- Advertisement -

corner meeting in Hudko

सायंकाळी हुडको भागात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे महानगर प्रमुख अल्पसंख्याक आघाडी जाकीर पठाण यांनी जयश्री महाजन यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या कॉर्नर सभेत जयश्री महाजन यांनी परिसरातील नागरिकांच्या समस्या ऐकून त्या सोडवण्याचे आश्वासन दिले. सभेत त्यांनी महाविकास आघाडीच्या विकासात्मक दृष्टिकोनाबद्दल सांगितले आणि स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी आपण तत्पर असल्याचे उपस्थितांना आश्वस्थ केले. या सभेला महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Yawal News | यावलमध्ये पाण्यासाठी महिलांचा आक्रोश! ५ किमीवरून...

Yawal News यावल |  मिलिंद जंजाळे| तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, वॉर्ड क्रमांक १, दुसरखेडा रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या काही वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र...

Gold Price | सोन्याच्या दरात मोठी घसरण! अजून किती...

Gold Price | साक्षीदार न्यूज | मार्च महिन्यात सोन्या आणि चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय घसरण नोंदवली गेली असून गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. Kedia...

Hindu Muslim Unity | साकळीतील ईद मिलाद सोहळ्यात हिंदू-मुस्लिम...

Hindu Muslim Unity यावल | मिलिंद जंजाळे | साकळी (बऱ्हाणपूर–अंकलेश्वर रोड) येथे मेश ऍग्रो कंपनीतर्फे आयोजित करण्यात आलेला ईद मिलाद सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात आणि...

RECENT NEWS