साक्षीदार | ३० नोव्हेबर २०२३ | भुसावळ तालुक्यातील जोगलखोरी येथील चक्कीजवळ पोलीस तक्रार केल्याच्या कारणावरून महिलेसह तिच्या मुलाला मारहाण केली. तर महिलेवर विळ्याने वार करून दुखापत केल्याची घटना २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता घडली. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील जोगलखोरी येथील अंजनाबाई सुधाकर मोरे (वय ३०) ही महिला आपल्या मुलांसह येथे वास्तव्याला असून मजूरी करून त्या आपला उदरनिर्वाह करतात. दरम्यान, या महिलेने पोलीसात केलेल्या तक्रारीच्या रागातून गावात राहणारे भाईदास धुलकर, शानुबाई धुलकर, सागर धुलकर आणि जीवन सोनवणे (सर्व रा. जोगलखोरी) यांनी अंजनाबाई व त्यांचा मुलाला बेदम मारहाण केली. तर सागर धुलकर याने विळा घेवून महिलेवर वार केल्याने त्यांच्या हाताला गंभीर इजा झाली होती. महिलेने तक्रारीवरुन भुसावळ तालुका पोलीसात भाईदास धुललकर, शानुबाई धुलकर, सागर धुलकर आणि जीवन सोनवणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक कैलास बाविस्कर करत आहेत.