साक्षीदार | १ नोव्हेबर २०२३ :-जळगाव शहरातील एका परिसरात ३४ वर्षीय महिलेच्या घरासमोर येवून वृद्धाने त्या महिलेला अश्लिल शिवीगाळ करीत विनयभंगाच्या उद्देशाने महिलेला धक्काबुक्की केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिसात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील जिल्हा पेठ पोलिस ठाण्याच्या परिसरात महिला वास्तव्यास आहे. दि. २८ ऑक्टोबर रोजी संशयित नारायण गोपाल हे वृद्ध त्या महिलेच्या घरासमोर आले. त्यांनी महिलेला अश्लिल शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच महिलेचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने तिला धक्काबुक्की करीत मारहाण देखील केली. महिलेचे कुटुंबीय तेथे आले असता त्यांनाही गोपाल यांनी शिवीगाळ करीत मारहाण केली. या प्रकरणी महिलेने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून नारायण गोपाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मीरा देशमुख करीत आहेत.