साक्षीदार | २६ ऑक्टोबर २०२३ | राज्यभरतील शेतकरी अनेक संकटात असतांना आता पुन्हा एकदा एक शेतकरी परिवार मोठ्या संकटात अडकले आहे. शेतीची मशागत करताना रोटाव्हेटरमध्ये आल्याने ट्रॅक्टर चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हि घटना वर्धा जिल्ह्यातल्या समुद्रपूर तालुक्याच्या निरगुडी येथे ही घटना घडली आहे. तोल गेल्यामुळे चालक ट्रॅक्टरवरून खाली पडला. त्यानंतर ट्रॅक्टरला लावलेल्या रोटाव्हेटरमध्ये येऊन त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन पिकाची कापणी झाल्याने ते रब्बी हंगामाच्या तयारीला लागले आहे. समुद्रपूर तालुक्याच्या निरगुडी येथे शेताची रोटाव्हेटरने मशागत सुरु होती. त्याचवेळी ट्रॅक्टर चालकाचा अचानक तोल गेला आणि तो खाली पडला. त्याचवेळी तो थेट रोटाव्हेटरमध्ये आल्याने अपघात झाला. या अपघातामध्ये ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला. पुरषोत्तम देवराव धोटे असं मृत ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे. या घटनेमुळे निरगुडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. निरगुडी येथील निलेश धोटे यांनी रब्बी हंगाम सुरू झाल्यामुळे शेतीच्या मशागतीसाठी रोटाव्हेटर यंत्र असलेले ट्रॅक्टर बोलावले होते. शेतीची मशागत सुरु असताना अचानक ट्रॅक्टर चालक पुरषोत्तम धोटे याचा ट्रॅक्टरवरून तोल गेला आणि ते खाली पडले. यात पुरषोत्तमच्या अंगावरून ट्रॅक्टरचे मोठे चाक गेले आणि त्याचे पाय रोटाव्हेटरमध्ये अडकले. या घटनेमध्ये गंभीर जखमी झालेल्या पुरषोत्तम यांचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला.