साक्षीदार | २३ नोव्हेबर २०२३ | जळगाव तालुक्यातील कानळदा या गावी कचरा फेकल्याच्या कारणावरून एका तरुणासह त्याच्या आईवर कुन्हाडीने वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना सोमवारी सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास घडली असून याप्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील कानळदा या गावी कृष्णा नारायण सपकाळे (वय-३५) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सोमवारी सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास कचरा फेकण्याच्या भांडणाच्या कारणावरून मिलिंद रवींद्र सपकाळे यांच्यासह इतरांनी तरुणासह त्याच्या आईला जबर मारहाण करीत कुन्हाडीने वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली असून याप्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.