भररस्त्यावर तरुणाने केला २१ वर्षीय तरुणीचा विनयभंग !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | १५ नोव्हेबर २०२३ | जळगाव शहरात भर रस्त्यावर एका २१ वर्षीय योगा शिक्षिका असलेल्या तरुणीचा एकाने विनयभंग केल्याची घटना दि.१४ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका परिसरातील २१ वर्षीय योगा शिक्षिका दि.१४ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास पिंप्राळा उड्डाणपूलनजीक ब्युटी पार्लरची ओर्डर करण्यासाठी जात असतांना संशयित आरोपीने तिच्या जवळ येत मला तुझ्याशी बोलायचे आहे असे म्हणून तिचा हात पकडला, यासह तिच्याशी चुकीचे वर्तन केल्याने तरुणीला लज्जा उप्तन्न झाली यासह तिला शिवीगाळ करीत तिच्या वडिलांना बघून घेण्याची धमकी देखील दिली. याप्रकरणी तरुणीने थेट रामानंद नगर पोलिसात धाव घेत विनयभंग केल्याप्रकरणी संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ.राजेश चव्हाण हे करीत आहेत.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS