साक्षीदार | २६ नोव्हेबर २०२३ | जळगाव शहरातील चित्रा चौक परिसरातील गुरुवारी सायंकाळी दारुच्या नशेत असलेल्या एकाने तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. यामध्ये तरुणाने हातातील वस्तूने तरुणाच्या कंबरेवर मारुन दुखापत केली. याप्रकरणी तरुणाविरुद्ध अदखपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील शिवाजी नगरातील मुगल गार्डन परिसरात तौसिफ शेख फिरोज हा तरुण वास्तव्यास आहे. मागील भांडणाच्या कारणावरुन संशयित अक्षय संजय आकुलकर रा. हमालवाडा शिवाजीनगर याने तौफिस सोबत वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी दोघांमध्ये भांडण झाल्याने अक्षयने तौसिफला शिवीगाळ करीत मारहाण केली. त्यानंतर त्याच्या हातातील वस्तूने तौसिफच्या कंबरेवर वार करीत त्याला गंभीर जखमी केले. याप्रकरणी तौसिफने दिलेल्या तक्रावरीवरुन संशयित अक्षय आकुलकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.