साक्षीदार | २८ नोव्हेबर २०२३ | राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरासह जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून अनेक गुन्हेगारी घटना उघडकीस येत असताना आता पुन्हा एकदा अशीच धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शोभायात्रा पाहून परतताना झालेल्या वादातून एका युवकाला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीनंतर युवकास उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते. उपचारादरम्यान युवकाचा मृत्यु झाल्याची माहिती समाेर आली आहे. हि घटना नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे घडली आहे.
मिळालेल्या माहितीनूसार रामटेक जवळच्या सितापार येथे राहणा-या तरुणाला रामटेक येथील गडमंदीर रस्त्यावर क्षुल्लक कारणावरून काहींनी बेदम मारहाण केली. त्यात एकाला गंभीर दुखापत झाली. त्याचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. विवेक विश्वनाथ खोब्रागडे असे मृत तरुणाचं नाव असल्याचे पाेलीसांनी नमूद केले.विवेक खोब्रागडे हा आपल्या मित्रासोबत 25 नोव्हेंबरला रामटेक शोभायात्रा पहाण्यासाठी आलेला होता. तेव्हा रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास गडमंदिर रामटेक वरुन मोटार सायकलने डब्बलसिट घरी परत येण्याकरीता निघाले. तेव्हा गडमंदिरवरुन खाली उतरत असताना रसत्यात संशयित आरोपी मनीष बंडुजी भारती (वय 36, रा.अंबाडा ता.रामटेक) आणि त्याच्या मित्रांनी त्यांची मोटार सायकल थांबवुन तुमचा मोटार सायकलने माझा मोटार सायकलला ठोस मारुन तुम्ही पळुन गेले असे म्हणुन शिवीगाळी केली.
विवेक आणि फैजान खान याला हातबुक्कीने लाताबुक्कीने मारपीट केली. काही वेळांनी फैजानचा भाऊ तेथे आल्यानंतर मनिष भारतीने त्याच्या गाडीचे नुकसान झाल्याचे सांगुन फैजानचा भावाकडुन 10 हजार रुपये घेतले. त्यानंतर फैजान आणि विवेक यांना घरी परत आले. सकाळी जखमी अवस्थेतील विवेकला रुग्णाला दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मारहाणीमुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे. रामटेक पोलीसांनी खूनाचा गुन्हा नोंद केलेला आहे.