पोहण्यासाठी गेलेला तरुण चिंचपाणी धरणात बुडाला !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | ११ ऑक्टोबर २०२३ | जळगाव तालुक्यातील वसंतवाडी येथे नुकतेच एक ४१ वर्षीय व्यक्ती तलावात बुडाल्याची घटना ताजी असतांना आता चोपडा तालुक्यातील बिडगाव येथून जवळच असलेल्या चिंचपाणी धरणात पोहण्यासाठी गेलेला पिंटू पावरा हा तरुण धरणात बुडाला. ही घटना मंगळवारी दि.१० दुपारी १२ वाजता घडली. मात्र पिंटूचा तपास रात्रीपर्यंत लागलाच नाही. यामुळे एन. डी. आर. एफ. च्या टीमला पाचारण करून बुधवारी सकाळी त्याचा शोध घेतला जाणार आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, बिडगावपासून जवळच असलेल्या बढाई येथील पिंटू डोंगरसिंग पावरा ( वय ३८) हा तरुण सहकाऱ्यांसह चिंचपाणी धरणात पोहण्यासाठी गेला होता. तो पोहत असताना अचानक पाण्यात बुडाला. त्यामुळे घाबरलेल्या सहकाऱ्यांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो आढळून आला नाही. यावेळी कुंड्यापाणीचे पोलिसपाटील मुसा तडवी, बिडगावचे पोलिसपाटील रामकृष्ण पाटील हे घटनास्थळी लगेचच हजर झाले.

या घटनेची माहिती अडावद पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश बुवा यांना देताच त्यांनी उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील, सहायक उपनिरीक्षक सुनील तायडे यांच्यासह घटनास्थळी लगेच भेट देऊन पाहणी केली. तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनाही कळविले. धरणात पाणीसाठा मोठ्या प्रमाणात असल्याने पिंटूचा शोध घेणे कठीण झाले. रात्री धरणावर नातेवाईक व कुटुंबातील सदस्य ठाण मांडून बसले होते.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Yawal News | यावलमध्ये पाण्यासाठी महिलांचा आक्रोश! ५ किमीवरून...

Yawal News यावल |  मिलिंद जंजाळे| तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, वॉर्ड क्रमांक १, दुसरखेडा रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या काही वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र...

Gold Price | सोन्याच्या दरात मोठी घसरण! अजून किती...

Gold Price | साक्षीदार न्यूज | मार्च महिन्यात सोन्या आणि चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय घसरण नोंदवली गेली असून गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. Kedia...

Hindu Muslim Unity | साकळीतील ईद मिलाद सोहळ्यात हिंदू-मुस्लिम...

Hindu Muslim Unity यावल | मिलिंद जंजाळे | साकळी (बऱ्हाणपूर–अंकलेश्वर रोड) येथे मेश ऍग्रो कंपनीतर्फे आयोजित करण्यात आलेला ईद मिलाद सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात आणि...

RECENT NEWS