साक्षीदार | ११ नोव्हेबर २०२३ | अमळनेर तालुक्यातील मुडी प्र डांगरी येथे तमाशात पोलिसाला शिवीगाळ करून धक्काबुक्की करणाऱ्या शिंदखेडा तालुक्यातील वालखेडा येथील वीज कर्मचाऱ्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुडी प्र डांगरी येथे यात्रेनिमित्त लोकनाट्य आयोजित करण्यात आले होते. १० रोजी पहाटे साडे बारा वाजता अचानक हुल्लडबाजी झाल्याने त्याठिकाणी बंदोबस्तावर असलेल्या मारवड पोलिस स्टेशनचे हेडकॉन्स्टेबल भरत ईशी, भरत गायकवाड, पोलिस पाटील केशवराव दगा पाटील यांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. त्यावेळी प्रदीप आनंदा शिरसाठ (रा. वालखेडा, ता. शिंदखेडा) याने भरत ईशी यांना शिवीगाळ केली व धक्काबुक्की करत खाली पाडले. त्यानंतरही प्रदीप शिरसाठ याने त्यांना धमकी दिली. हेडकॉन्स्टेबल भरत ईशी यांनी मारवड पोलिस स्टेशनला फिर्याद दिली. शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.