ACB Labor Inspector ; कामगार निरीक्षकाला ACB ने 36,000 रुपये रंगेहात पकडले |2024 |

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

ACB Labor Inspector  जळगाव (साक्षीदार न्युज) : – सहकामगार आयुक्त कार्यालयात मधील एका कामगार निरीक्षकाने मुकादम पदावरून दिलेली स्थगिती उठविण्यासाठी व त्यासंदर्भातील सहायक कामगार आयुक्त यांच्याकडे असलेल्या सुनावणीचा निकाल आपल्या बाजूने लावून देण्यासाठी तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती .तडजोडीअंती ३६ हजार रुपये रंगेहात स्वीकारताना जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ निरीक्षकाला पकडले आहे.

- Advertisement -

अटक कारण्यात आलेल्या कामगार निरीक्षकांचे नाव चंद्रकांत पंडितराव पाटील (वय ५७, रा. वाघ नगर, जळगाव) असून तक्रादार हे दोघेही मित्र असल्याचे समजते . ५१ वर्षीय तक्रारदार हे माथाडी कामगार संघटनाचे उपाध्यक्ष व मुकादम मुकादम होते. त्यांना मुकादम पदावरून काही स्थगिती देण्यात आली होती. त्याबाबत सहायक कामगार आयुक्त यांच्याकडे सुनावणी देखील सुरु होती . सुनावणीचा निकाल मी सहायक कामगार आयुक्त यांच्याकडून निकाल तुमच्या बाजूने लावून देतो त्यासाठी मला ५० हजार रुपये मागणी करण्यात आली होती . या संबंधित प्रकाराबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव यांच्याकडे दि. ५ ऑगस्ट रोजी तक्रार दिली होती.

सदर तक्रारीची लाच मागणीची पडताळणी केली असता चंद्रकांत पाटील यांनी पंचासमक्ष तडजोडअंती ३६ हजार रुपये स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांचे वर जिल्हापेठ पोलीस स्टेशन, जळगांव येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे. सदर कारवाई हि पर्यवेक्षक अधिकारी पोलिस उप अधीक्षक सुहास देशमुख, तपास अधिकारी पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, पो.नि.एन.एन.जाधव,पीएसआय दिनेशसिंग पाटील,पो.हे.कॉ. सुरेश पाटील,पो.हे.कॉ.रविंद्र घुगे,म.पो.हे.कॉ.शैला धनगर, पो.ना.बाळू मराठे,पो.कॉ.प्रणेश ठाकूर, पोना.किशोर महाजन,पो.ना. सुनिल वानखेडे,पो.कॉ.प्रदीप पोळ,पो.कॉ.राकेश दुसाने, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी,पो.कॉ. सचिन चाटे यांनी कारवाई केली.

ACB Labor Inspector

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

RECENT NEWS