back to top
गुरूवार, ऑगस्ट 21, 2025

BIG BREAKING ; कंत्राटी वायरमनला दिला ACB ने दिला शॉक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

साक्षीदार न्यूज ; – एका ग्राहकाने घरात वीज मीटर नसत्यांना देखील वीज वापर केल्याप्रकरणी महावितरणाकडून दंडाची नोटीस देण्यात आली होती . दंडाची रक्कम कमी करण्याच्या मोबदल्यात १ लाखांची लाच स्विकारताना जळगाव शहरात प्रशांत विकास जगताप (वय ३३) या कंत्राटी वायरमनला एसीबी पथकाने रात्री अटक केली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील महावितरण कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

या बाबत सविस्तर वृट असे की , जळगाव शहरातील एका ५३ वर्षीय तक्रारदार यांचे घराचे बांधकाम नुकतेच पूर्ण झाल्याने घराला वीज मीटर बसवून मिळावे म्हणून महावीआतरांकडे अर्ज केला होता. परंतु घराला मीटर नसतांना देखील वीज वापरात असल्या कार्नेन महावितरणाकडून भरारी पथकाने भेट दिल्यावर त्यांना ४ लाख ६० हजार रुपये दंडाची रक्कम भरण्याची नोतीस देण्यात आली होती. दंड भरला तरच वीज मीटर कनेक्शन मिळेल असा निरोप कंत्राटी वायरमन यांनी दिला होता. त्यानंतर तक्रारदार यांनी कंत्राटी वायरमन यांची भेट घेऊन त्यांच्याशी बोलणी केली असता १ लाख ६० हजार रुपयांमध्ये प्रकरण मिटवतो असे सांगून लाचेची मागणी केली होती.

तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून पंचासमक्ष पडताळणी केली असता कंत्राटी वायरमन यांनी तडजोडी अंती १ लाख ४० हजार रुपयांची मागणी करून पंचा समक्ष १ लाख रुपये आज रोजी स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. प्रशांत विकास जगताप (वय ३३) यांच्यावर जळगांव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

या पथकाने केली कारवाई
पोलिस उप अधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, सफौ दिनेशसिंग पाटील, पोना.सुनिल वानखेडे, पो.ना.बाळू मराठे, पोशी.राकेश दुसाने यांनी सापळा लावला. तर पोलीस निरीक्षक एन. एन. जाधव, स.फौ.सुरेश पाटील, पो.ह.रविंद्र घुगे, मपोहेकॉ शैला धनगर, पो.ना.किशोर महाजन, पो.कॉ. प्रदीप पोळ, पो.कॉ,पो. कॉ.प्रणेश ठाकुर, पोशी अमोल सूर्यवंशी, पोशी सचिन चाटे यांच्या पथकाने सहकार्य केले.

 

ACB 

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Big News Ration Card | केंद्राचा मोठा निर्णय: 1.17...

Big News Ration Card | साक्षीदार न्यूज  | केंद्र सरकारने राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA) स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 1.17 कोटी रेशनकार्डधारकांना...

Domestic Violence | यावल येथे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार; पाच...

Domestic Violence | साक्षीदार न्यूज | यावल येथील पोलीस ठाण्यात एका महिलेने आपले पती, सासू, जेठ, जेठाणी आणि नणंद यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठी...

Electric shock | वरखेडी गावात करंट लागल्याने पाच जणांचा...

Electric shock एरंडोल | साक्षीदार न्यूज | आज सकाळी तालुक्यातील वरखेडी गावात एक हृदयद्रावक घटना घडली. गावालगतच्या म्हसावद रस्त्याजवळील शेतात कामासाठी जात असताना वीज...

RECENT NEWS