ACB Trap साक्षीदार न्युज ; – महानगर पालिकेचे भंगार चोरीचे प्रकरण सुरु असतांना आज दुपारी अजून एक प्रकरण समोर आले आणि ते म्हणजे बांधकाम परवानगी व घराचे भोगवटा प्रमाणपत्र देण्याचे तीन प्रकरणापैकी दोन प्रकरणांसाठी २१ हजार रुपयांची मागणी करत पहिल्या प्रकरणासाठी १५ हजारांची लाच स्विकारत्यांना जळगाव महापालिकेतील नगररचना विभागाचे रचना सहाय्यक अधिकारी यांना रंलाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
👉🏽 मोठी बातमी ; जळगावचा RTO अधिकारी ACB च्या जाळ्यात
मनोज समाधान वन्नेरे (वय ३४, जळगाव) असे अटक केलेल्या नगररचना सहाय्यक अधिकाऱ्याचे नाव आहे. तालुक्यातील खेडी बुद्रुक येथील तक्रारदार यांनी बांधकाम परवानगीचे व बांधकाम झालेले घराचे भोगवटा प्रमाणपत्र मिळण्याचे प्रकरण जळगाव महानगरपालिकेत मंजुरीसाठी टाकले होते. त्यांनी एकूण महापालिकेत ३ प्रकरणे दाखल केलेले आहेत, पहिल्या प्रकरणात पडताळणी करण्यासाठी नगररचना सहाय्यक अधिकारी मनोज वन्नेरे यांनी सुरुवातीला पहिल्या प्रकरणात २१ हजारांची मागणी केली, त्यानंतर तडजोडीअंती १५ हजार रूपये देण्याचे ठरले.
तसेच दुसऱ्या प्रकरणात १५ हजार रुपये महापालिका आयुक्त आणि सहाय्यक संचालक यांना देण्यासाठी मागितले. असे एकूण त्यांनी ३० हजार रुपयांची मागणी केली. त्यानुसार तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. तक्रारीनुसार पथकाने सोमवारी दि. ९ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता सापळा रचला. दरम्यान १५ हजारांची लाच स्वीकारताना जळगाव महापालिकेतील नगर रचना सहाय्यक अधिकारी मनोज वन्नेरे यांना रंगेहात पकडण्यातआले.
👉🏽 तहसीलदार यांच्या वाहनावर वाळू माफियांचा हल्ला
या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलीस उपअधिक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, पोउनि सुरेश पाटील, पोलीस नाईक किशोर पाटील, राकेश दुसाने यांनी कारवाई केली आहे.