Accident ; भजनी मंडळाच्या चारचाकीचा भीषण अपघात : १ ठार तर दोन जखमी !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | ३१ ऑक्टोबर २०२३ | जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून दिवसा व रात्री अपघाताची मालिका सुरु असतांना नुकतेच भडगाव तालुक्यातील पिंपळगाव गिरणा थडी गावातील भजनी मंडळाच्या कारला जामनेर तालुक्यातील शेरी लोंद्री रस्त्यावरील वळण रस्त्यावर रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास अपघात झाला. यात दिलीप रमेश पाटील हे जागीच ठार झाले तर अन्य दोन जण जखमी असून, एक गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव तालुक्यातील पिंपळगाव गिरणा थडी येथील भजनी मंडळ कारने (एमएच १९, सीवाय ४५०८) भजनासाठी कासली (ता. जामनेर) येथे लोंद्री मार्गाने जात असताना शेरी-लोंद्री रस्त्यावरील योगेश पाटील यांच्या शेताजवळील वळण रस्त्यावर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले व कार झाडावर आदळली. कारमध्ये एकूण पाच जण बसलेले होते. यातील दिलीप रमेश पाटील जागीच ठार झाले तर हेमंत सुभाष पाटील (३२) हे गंभीर जखमी असून, सतीश साहेबराव पाटील हे किरकोळ जखमी झाले आहेत. अन्य दोन जण बचावले आहेत. शेरी ग्रामस्थांबरोबरच घटनास्थळी पोलिस कर्मचारी रवींद्र देशमुख, भरत लिंगायत, हेमंत सोनवणे यांनी तातडीने येत मदतकार्य केले. रुग्णवाहिका वेळेवर न पोहोचल्याने जखमींना तातडीने पहूर ग्रामीण रुग्णालयात पोलिस वाहनातून दाखल केले. ग्रामीण रुग्णालयात जखमींवर प्राथमिक उपचार करून जळगावला हलविण्यात आले. सोमवारी मृत दिलीप पाटील यांचे शवविच्छेदन करून मतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. या घटनेने समस्त पिंपळगाव गिरणा थडी परिसरावर शोककळा पसरली आहे.

Accident

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS