अपघातात मानेची नस कापल्याने एक जण ठार तर दुसरा गंभीर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

जळगाव ; – लग्न कार्यातून घरी दुचाकीने परततांना दुचाकी घसरल्याने ती दुभाजकावर आदळली व तेथे असलेल्या पत्र्याने मानेची नस कापली जाऊन विटनेर येथील १६ वर्षीय दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर सोबत असलेला मित्र गंभीर जखमी झाल्याची घटना जळके गावाजवळ घडली आहे. चेतन दीपक वराडे (वय- १६, रा. विटनेर, ता. जळगाव) असे मयत झालेल्या मुलाचे नाव आहे. तर पुष्पल राजाराम गायकवाड (वय-२०, रा. विटनेर, ता. जळगाव) हा तरुण जखमी झाला. याबाबत एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

क्लिक करा ; – तहसीलदार बनले कॉलेज कुमार ; वाळू चे १६ ट्रॅक्टर पकडले

नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील विटनेर येथील रहिवासी असलेला चेतन वराडे हा युवक इयत्ता दहावीला असून तो व पुष्पल गायकवाड हे दोघेजण बुधवारी ३ जानेवारी रोजी दुचाकीने लग्नाला गेले होते. लग्नाहून परतत असताना दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास वावडदे ते विटनेर दरम्यान जळके गावाजवळ दुचाकी घसरली. त्यानंतर ती दुभाजकावर आदळली व दुभाजकावरील पत्र्याने चेतनच्या मानेची नस कापली गेली त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. या सोबतच पुष्पल यालाही मार लागला. अपघातानंतर मयत व जखमीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व मित्रांनी रुग्णालयात धाव घेतली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Accident

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Yawal News | यावलमध्ये पाण्यासाठी महिलांचा आक्रोश! ५ किमीवरून...

Yawal News यावल |  मिलिंद जंजाळे| तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, वॉर्ड क्रमांक १, दुसरखेडा रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या काही वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र...

Gold Price | सोन्याच्या दरात मोठी घसरण! अजून किती...

Gold Price | साक्षीदार न्यूज | मार्च महिन्यात सोन्या आणि चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय घसरण नोंदवली गेली असून गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. Kedia...

Hindu Muslim Unity | साकळीतील ईद मिलाद सोहळ्यात हिंदू-मुस्लिम...

Hindu Muslim Unity यावल | मिलिंद जंजाळे | साकळी (बऱ्हाणपूर–अंकलेश्वर रोड) येथे मेश ऍग्रो कंपनीतर्फे आयोजित करण्यात आलेला ईद मिलाद सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात आणि...

RECENT NEWS