PM Modi Police Accident ; पंतप्रधान मोदींच्या सभेला बंदोबस्तासाठी जाणाऱ्या पोलीस वाहनाचा अपघात : ५ ठार !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | १९ नोव्हेबर २०२३ | देशभरातील अनेक राज्यात निवडणुकीचा माहोल सुरु असतांना राजस्थानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा असल्याने याठिकाणी बंदोबस्तासाठी जाणाऱ्या पोलिसांच्या वाहनाचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली असून या अपघातात ५ पोलीस कर्मचारीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हि घटना राजस्थानमध्ये घडली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सर्व पोलीस कर्मचारी ड्यूटीसाठी निघाले होते. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत. सदर घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय. पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी सर्व पोलिसांची ड्यूटी लागली होती. नागौर जिल्ह्यातील खिंवसर ठाण्याचे पोलिस कर्मचारी गाडीमधून एकत्र निघाले होते.

नागौरनंतर चुरु जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. पोलिसांचे वाहन आणि ट्रकची धडक झाल्याने हा मोठा अपघात घडला. चुरूतल्या तारानगर येथे रविवारी पंतप्रधान मोदींची सभा पार पडणार आहे. सकाळी १० वाजता या सभेला सुरूवात होणार होती. मात्र तेथे पोहचण्यापूर्वीच काळाने पोलिसांवर घाला घातला. अपघात झाल्याने रस्त्यावर वाहनांची लाबंच लांब रांग लागली होती. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. तसेच वाहतूक सुरळीत केली.

PM Modi Police Accident

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS