५ वर्षापासून फरार आरोपी जळगाव पोलिसांच्या ताब्यात !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | ५ नोव्हेबर २०२३| गेल्या पाच वर्षापासून पोलिसांना चकमा देणाऱ्या व ठाणे, पालघर येथे अनेक दरोडे टाकून फरार असलेल्या आरोपी प्रथमेश उर्फ डॉन प्रकाश ठमके (२४, रा. उल्हासनगर, जि. ठाणे) याला जळगाव येथे सिंधी कॉलनीतून एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या डॉनचा अडीच कि.मी. पाठलाग करून पोलिसांनी सिनेस्टाईल पद्धतीने पकडले. ही कारवाई शनिवार, ४ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता केली.

- Advertisement -

प्रथमेश ठमके हा ठाणे व पालघर परिसरात मोठमोठे दरोडे टाकून फरार व्हायचा. त्याच्यावर दरोड्यासह इतर वेगवेगळे १६ गुन्हे दाखल आहेत. गेल्या पाच वर्षांपासून ठाणे, पालघर पोलिसांसह राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणचे पोलिस त्याचा शोध घेत होते. प्रथमेशचे काही नातेवाईक जळगावात राहतात. त्यामुळे तो जळगावात आला असून, सिंधी कॉलनीत असल्याची माहिती जळगाव एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्या सूचनेनुसार पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, रुपाली महाजन, जिल्हा विशेष शाखेचे सहायक फौजदार दिनेश बडगुजर, पोकों अमित मराठे, पोलिस नाईक जुबेर तडवी हे सिंधी कॉलनीत पोहोचले. त्या ठिकाणी पोलिसांना पाहून प्रथमेशने पळ काढला. त्यावेळी वरील पथकाने त्याचा अडीच कि.मी. पळत जाऊन पाठलाग केला व त्याला जिल्हा पेठ पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले. त्याला ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक रुपाली पोळ यांच्या ताब्यात दिले आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

Heart Attack | धक्कादायक! धावत्या दुचाकीवरच तरुणाचा मृत्यू; हृदयविकाराचा...

Heart Attack यावल | मिलिंद जंजाळे | यावल शहरातील अंकलेश्वर–बऱ्हाणपूर राज्य मार्गावरील चोपडा नाक्याजवळ एका ३२ वर्षीय तरुणाचा धावत्या दुचाकीवर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने...

RECENT NEWS