Human Rights Association | अचलपूर नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा रुपाली माथने यांचा मानवधिकार संघटनेतर्फे सत्कार; शहरातील प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Human Rights Association अचलपूर | साक्षीदार न्यूज | अचलपूर नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौं. रुपाली अभय माथने यांचा आंतरराष्ट्रीय मानवधिकार वेलफेअर असोसिएशन, अचलपूर–परतवाडा यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शहरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मूलभूत नागरी समस्या व नागरिकांच्या अडचणींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

- Advertisement -

या भेटीदरम्यान संघटनेच्या वतीने नगराध्यक्षा माथने यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात विशेषतः कॉटन मार्केट ते आष्टामासिद्धी या मुख्य मार्गाचे चौपद्रीकरण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. या मार्गावर शाळा असल्यामुळे विद्यार्थ्यांची सतत ये-जा असते, त्यामुळे अपघात टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

तिक्रमण, वाहतूक व शालेय सुरक्षिततेवर भर

निवेदनात शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण हटवावे, तसेच रस्त्याच्या कडेला उघड्यावर सुरू असलेली मांस-मटण विक्री थांबवून संबंधित दुकानदारांना शहराबाहेरील योग्य जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय शाळा व महाविद्यालय परिसरात पान, गुटखा व तत्सम पदार्थांच्या विक्रीवर सक्त बंदी आणावी, असेही स्पष्ट करण्यात आले.

- Advertisement -

शाळा व महाविद्यालय परिसरातील अतिक्रमण पूर्णतः हटवून विद्यार्थी वाहने, शाळकरी वाहने व पालकांच्या वाहनांसाठी स्वतंत्र व सुरक्षित वाहतूक व्यवस्था निर्माण करावी, अशी सूचना निवेदनात करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या रस्ता सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना तसेच शाळांमध्ये प्राथमिक आरोग्य किट उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली.

नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन

या वेळी नगराध्यक्षा सौं. रुपाली माथने यांनी शहरातील नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे गांभीर्याने लक्ष देऊन टप्प्याटप्प्याने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन दिले.

निवेदन सादर करताना आंतरराष्ट्रीय मानवधिकार वेलफेअर असोसिएशनचे स्थानिक पदाधिकारी श्री सुनील भोरे, श्री महेंद्र निंबेकर, श्री गौरव डाकरे, श्री किशोर मोहोड, अचलपूर तालुका अध्यक्ष श्री सुधीर मानेकर, श्री संदीप चेडे, श्री अनिलभैया तायडे, श्री किशोर काळे, श्री लवटे आदी मान्यवर उपस्थित होते.

LIVE । दादांना अखेरचा निरोप । लाखो जनसमुदायांच्या डोळ्यात पाणी…

राजकारणातील ” दादा ” माणूस गेला

Human Rights Association

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS