back to top
गुरूवार, ऑगस्ट 21, 2025

Guardian Minister Gulabrao Patil ; गावाची एकजूट कायम ठेवून एकोप्याने “गावाचा विकास ” साध्य करा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Guardian Minister Gulabrao Patil जळगाव (साक्षीदार न्युज ); – दि. 20 ऑगस्ट – गावाच्या एकजुटीवर गावातील कोणते काम अशक्य नाही. शासनाच्या विविध योजना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवून , ग्रामपंचायत मध्ये येणाऱ्या प्रत्येकाला न्याय देण्याची भूमिका सरपंच, सदस्यांनी ठेवून गावाची एकजूट कायम ठेवून एकोप्याने “गावाचा विकास ” साध्य करा. गावाची झालेली बिनविरोध निवडणूक ही गावाच्या एकीचे बळ आहे. गावातील उर्वरित विकास कामासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. ते पथराड खु. येथे विविध विकास कामांच्या लोकार्पण व भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.

- Advertisement -

Guardian Minister Gulabrao Patil

या कामांचे झाले भूमिपूजन व लोकार्पण
शेकडो ग्रामस्थांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे फटाक्यांच्या आतिशबाजीत व ढोल – ताश्यांच्या गजरात शाल श्रीफळ देऊन स्वागत केले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पथराड ते मुसळी फाटा डांबरीकरण करणे ( 6 कोटी 15 लक्ष) रस्त्याचे भूमिपूजन तसेच गाव संरक्षण भिंत (18 लक्ष), गाव अंतर्गत पेव्हिंग ब्लॉक बसविणे (12 लक्ष), स्मशानभूमी सुशोभीकरण (4 लक्ष), मुलभूत सुविधे अंतर्गत पेव्हिंग ब्लॉक बसविणे (05 लक्ष), लोकार्पण विधिवत पूजा करून करण्यात आले.

- Advertisement -

नवनिर्वाचितांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला सत्कार
यावेळी पथराड खु. चे नवनिर्वाचित लोक नियुक्त सरपंच मंजुळाबाई श्रीकांत चव्हाण , उपसरपंच गजानन पाटील, बोरगाव बु. चे नवनिर्वाचित सरपंच उषाबाई मराठे यांचा शाल श्रीफळ देवून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. गावात व परिसरात भगवे झेंडे, मोठ – मोठे बॅनर व भगव्या पताका लावून परिसरातील वातावरण भगवामय झाले होते. कार्याक्रमचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख भैया मराठे यांनी केले. आभार श्रीकांत चव्हाण यांनी मानले.

👉🏽 जळगावात देश सोडण्याच्या का दिल्या नोटीस

 

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील, माजी जिल्हा परिषद प्रतापराव पाटील, लोक नियुक्त सरपंच मंजुळाबाई श्रीकांत चव्हाण , उपसरपंच गजानन पाटील, बोरगाव बु. चे नवनिर्वाचित सरपंच उषाबाई मराठे, ॲड. शरद पाटील, माजी सभापती प्रेमराज पाटील , मुकुंदराव नन्नवरे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष सचिन पवार, तालुका संघटक रविंद्र चव्हाण सर, दीपक भदाणे, परिसरातील सरपंच कैलास सोनवणे, प्रवीण पाटील, कैलास पाटील, डॉ.उत्पल कुंवर, व परिसरातील पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Guardian Minister Gulabrao Patil

 

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Big News Ration Card | केंद्राचा मोठा निर्णय: 1.17...

Big News Ration Card | साक्षीदार न्यूज  | केंद्र सरकारने राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA) स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 1.17 कोटी रेशनकार्डधारकांना...

Domestic Violence | यावल येथे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार; पाच...

Domestic Violence | साक्षीदार न्यूज | यावल येथील पोलीस ठाण्यात एका महिलेने आपले पती, सासू, जेठ, जेठाणी आणि नणंद यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठी...

Electric shock | वरखेडी गावात करंट लागल्याने पाच जणांचा...

Electric shock एरंडोल | साक्षीदार न्यूज | आज सकाळी तालुक्यातील वरखेडी गावात एक हृदयद्रावक घटना घडली. गावालगतच्या म्हसावद रस्त्याजवळील शेतात कामासाठी जात असताना वीज...

RECENT NEWS