दुचाकी घसरल्याने तरूणाचा जागीच मृत्यू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

वरणगाव ; – विल्हाळे ते वरणगाव रस्त्यावरून घरी जात असतांना अचानक दुचाकी घसरून डोक्याला दुखापत झाल्याने दुचाकीस्वार तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी १५ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता घडली आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मनोज अशोक नाथ वय ३३ रा. रामपेठ वरणगाव ता.भुसावळ असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरातल्या रामपेठ येथे मनोज नाथ हा आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. सोमवारी १५ जानेवारी रोजी दुपारी मनोज हा दुचाकीने वेल्हाळे येथून घरी जाण्यासाठी निघालेला होता. विल्हाळे ते वरणगाव रस्त्यावर त्यांची दुचाकी अचानक रस्त्यावर घसरली. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रस्त्यावरील ग्रामस्थांनी धाव घेवून त्याला खासगी वाहनाने वरणगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. यावेळी रूग्णालयात नातेवाईकांची गर्दी होती. या घटनेबाबत वरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील हे करीत आहे.

Acident Varangaon

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS