जळगावात सट्टाजुगार खेळणाऱ्यांवर कारवाई !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | ३० नोव्हेबर २०२३ | जळगाव शहरातील गांधी मार्केटच्या आवारात सट्टाजुगार खेळणाऱ्यांवर शहर एलसीबीच्या बुधवारी कारवाई केली. याठिकाणाहून १ हजार ८० रुपयांची रोकड जप्त केली असून सट्टा खेळविणाऱ्या सचिन आनंदा जाधव (वय २५, रा. जोशीपेठ) याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील गांधी मार्केट परिसरात सट्टा जुगार खेळविला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली. त्यांनी विजय पाटील, रवी नरवाडे, प्रफुल्ल धांडे, राजकुमार चव्हाण, योगेश पाटील, अमोल ठाकूर यांना सोबत घेवून गांधी मार्केटच्या आवारात सुरु असलेल्या सट्टापेढीवर धाड टाकली. याठिकाणी कागदावर सद्याचे आकडे खेळणारे पळून गेले तर सट्टा खेळविणारा सचिन जाधव याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडून सट्टा खेळविण्याच्या साहित्यासह १ हजार ८० रुपये मिळून आले. तसेच त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने हा सट्टा शैलेश ठाकरे यांचा असून तो याठिकाणी रोजंदारीने काम करीत असल्याचे सचिन जाधव यांने पोलिसांना सांगितले. त्यानुसार विजय पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरुन संशयित सचिन जाधव याच्याविरुद्ध शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS