अभिनेता सलमान खान ‘टायगर ३’ साठी घेतले इतके मानधन !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | ७ नोव्हेबर २०२३ | देशात अभिनेता सलमान खानचा प्रत्येक चित्रपटाला चाहत्याची मोठी गर्दी असते तर अनेक चित्रपट गृहाबाहेर हाऊसफुलचे बोर्ड देखील दिसत असतात. त्याच्या चाहत्यांसाठी एखाद्या उत्सवापेक्षा कमी नसतात. जेव्हा जेव्हा भाईजानचे चित्रपट थिएटरमध्ये दाखवले जातात तेव्हा एकच खळबळ उडते. यावेळीही असेच वातावरण पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

दिवाळीच्या खास मुहूर्तावर यंदाचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘टायगर ३’ प्रदर्शित होणार आहे. सलमान खानचे चाहतेही या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. दरम्यान, यशराज बॅनरखाली बनलेल्या या बिग बजेट चित्रपटाबाबत आता एक खास माहिती समोर आली आहे. ‘टायगर ३’साठी सलमान खानने किती पैसे घेतले याचा खुलासा झाला आहे. कोइमोईच्या रिपोर्टनुसार, भाईजानने टायगर ३ साठी १०० कोटी रुपये मानधन घेतले आहे.
एवढेच नाही तर सलमान खान या चित्रपटाच्या नफ्यातील ६० टक्के वाटादेखील घेणार आहे. यानुसार भाईजानच्या फीची रक्कम जवळपास १०० कोटी रुपये असल्याचे बोलले जात आहे. मात्र, चित्रपटाच्या नफ्यानुसार सलमान खानची फी वाढू किंवा कमी होऊ शकते. चित्रपटाची आगाऊ बुकिंग पाहता टायगर ३ चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालणार आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

चित्रपटाची आगाऊ बुकिंग सुरू झाली असून तिकीटबारीवर झुंबड उडाली आहे. होय, तिकीट खिडकीवर बिनदिक्कतपणे चित्रपटाची तिकिटे विकली जात आहेत. Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, चित्रपटाने आधीच आगाऊ बुकिंगमध्ये ४.२ कोटी रुपये कमावले आहेत आणि १४०००० पेक्षा जास्त तिकिटे विकली गेली आहेत. हा चित्रपट दिवाळीच्या खास मुहूर्तावर प्रदर्शित होत आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS