साक्षीदार | १९ ऑक्टोबर २०२३ | हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेते अभिनेत्री सोशल मिडीयावर आपले मत व्यक्त करीत असतात. काहीना नेटकरी ट्रोल करीत असतात तर काहीना सपोर्ट देखील करीत असतात. अशाच एक नावाजलेल्या अभिनेत्रीने एक पोस्ट सोशल मिडीयावर केली आहे. ती अभिनेत्री म्हणजे राणी मुखर्जी, या अभिनेत्रीने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने, आवाजाने आणि आपल्या सौंदर्याने वर्षानुवर्षे चाहत्यांची मने जिंकली आहेत. राणीने तिच्या कारकिर्दीत एकापेक्षा एक चित्रपट केले आहेत.
गेल्या 27 वर्षांत तिनं आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केलं आहे. बॉलिवूडमध्ये 27 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल राणीने आनंद व्यक्त केला. शिवाय, तिनं पहिल्या चित्रपटाशी संबंधित काही किस्सेही शेअर केले. राणीने 1997 मध्ये आलेल्या ‘राजा की आयेगी बारात’ या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयाची प्रेक्षकांनी खूप प्रशंसा केली होती. प्रसारमाध्यमांशी बोलताना राणी मुखर्जी म्हणाली, ‘२७ वर्षे झाली असे वाटत नाही. या क्षणी जेव्हा मी मागे वळून पाहते, तेव्हा असे वाटते की जणू काही वर्षांपूर्वीच मी पदार्पण केलं होतं. ‘राजा की आयेगी बारात’ हा माझा पहिला चित्रपट आणि त्या चित्रपटातून मला जे काही शिकायला मिळाले, ते मी कधीही विसरणार नाही.’