back to top
गुरूवार, ऑगस्ट 21, 2025

Adishakti Muktai ; आदिशक्ती मुक्ताई म्हणजे मोक्षप्राप्तीसाठीची आई – ज्येष्ठ समाजसेवक ह .भ .प .डॉ. रवींद्र भोळे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Adishakti Muktai ; पुणे (दिघी आळंदी रोड): – पृथ्वीतलावरील जन्माला आलेला प्रत्येक जीवात्मा अमर नाही ,मर्त्य आहे. भगवंत चरणी विलीन होईपर्यंत प्रत्येकाला सुख आणि दुःख, जन्म आणि मृत्यू ह्या फेऱ्यातून जावेच लागते. मनुष्य देहाचे पृथ्वीतलावरील मुख्य प्रयोजन म्हणजे मोक्षप्राप्ती, म्हणजे मुक्ती मिळवणे हे होय. सलोकता ,समीपता ,स्वरुपता व सायुज्यता असे संत महात्म्यांनी एकूण चार मुक्तीचे वर्णन केलेले आहे. म्हणून जगाला मोक्षप्राप्तीसाठी आदिशक्ती मुक्ताईने ब्रह्मज्ञानाचाअलभ्य लाभ साधकाला होण्यासाठी ताटीच्या अभंगाद्वारे माऊलींना प्रेरणा दिली.

- Advertisement -

आदिशक्ती मुक्ताईच्या प्रेरणा स्तोत्रामुळे माऊलींनी ईश्वराचे ज्ञान असलेली अलौकिक अभौतिक ,चिरंतर , चैतन्यमय आनंदाचा ठेवा व भक्तांना चिरकाल, चिरंतर स्फूर्ती देणारी ज्ञानेश्वरी लिहिली . महान योगिनी आदिशक्ती मुक्ताई यांच्या ताटीच्या अभंगांच्या प्रेरणेमुळेच पृथ्वीवरील अमृत म्हणजे ज्ञानेश्वरीचा आस्वाद जगाला घेता येत आहे. महायोगीनी आदिशक्ती मुक्ताई साधकांच्या मोक्षप्राप्तीसाठीची आई ठरली असे ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार ह भ प डॉ. रवींद्र भोळे यांनी येथे व्यक्त केले. श्री संत आदिशक्ती मुक्ताई देवस्थान यांच्या वतीने आदिशक्ती मुक्ताई मंदिराचा प्रथम वर्धापन दिन व श्री संत आदिशक्ती तेजो विलीन सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन येथे करण्यात आले होते. याप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ.रवींद्र भोळे पुढे म्हणाले की अध्याय आठव्या श्लोक क्रमांक दहा मधील गीतेतील श्लोक अनुसार ‘भक्त्या युक्तो योग बलेनचैव’ यानुसार आदिशक्ती मुक्ताई आपले पृथ्वीतलावरील जीवन कृतार्थ, कृतकृत्य करून मेहुल मुक्ताईनगर येथे तेजो विलीन झाली.

आदिशक्ती मुक्ताई देवस्थानच्या कार्यकर्त्यांनी त्या मातीतील स्मृतिगंध,सुगंध आणि मुक्ताईचा मोक्षप्राप्तीचा ठेवा आज येथे दिघी परिसरामध्ये चिरंतर तेवत ठेवला आहे. हे कौतुकास्पद आहे. साधकांनी , नववधूंनी,सासुरवाशींनी व माहेरवाशींनी ह्या तीर्थक्षेत्रावर नतमस्तक होऊन आपल्या पुढील जीवनाचा प्रवास करावा, व या आनंदाच्या डोहामध्ये ,आनंदाने बुडून जावे असे मत त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी डॉ.एल झेड पाटील लिखित आदिशक्ती मुक्ताबाई चरित्र लेखन पुस्तकाचे प्रकाशनही ज्येष्ठ प्रवचनकार ह भ प डॉ.रवींद्रजी भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कु. सिद्धी मनोज बऱ्हाटे, कु.श्रुती चंद्रकांत टेकाडे, कु. प्रगती सुधाकर पाटील या दहावीतील गुणवंत विद्यार्थिनींचा स्मृतिचिन्ह सन्मान देऊन सत्कार करण्यात आला. तसेच कुमारी मृणाल पांडुरंग कोलते ह्या विद्यार्थिनींना बारावीतील नेत्र दीपक यशाबद्दल सन्मानित करण्यात आले. याच कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ समाजसेवक ह भ प डॉक्टर रविंद्र भोळे यांना दिल्ली येथे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय विचार मंच दिल्ली या संस्थेच्या वतीने अतिशय प्रतिष्ठेची हिंदू रत्न उपाधी मिळाल्याबद्दल आदिशक्ती मुक्ताई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री अमोल पाटील यांनी गरुडाची प्रतिकृती असलेले खास स्मृतीचिन्ह पुष्पगुच्छ शाल श्रीफळ दौंड सन्मानित केले. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे भोसरी विधानसभा आमदार श्री महेश दादा लांडगे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका सत्ता रूढ पक्षनेते नामदेव ढाके, भोसरी विधानसभा शिवसेनाप्रमुख नितीन बोंडे, आदिशक्ती मुक्ताई चरित्र लेखक डॉ. एल झेड पाटील, सौ रेखा भोळे, सौ दिपाली नारखेडे,आदिशक्ती मुक्ताई देवस्थान कमिटी ,अध्यक्ष अमोल विष्णू पाटील, उद्धव नारखेडे, दीपक नारखेडे, सचिन पाटील, उल्हास खर्चे, श्रीकृष्ण पाटील, चेतन चोपडे, राजू भारंबे, प्रणव सुपे, अरविंद कोलते, अजय नारखेडे, प्रशांत तळोले व अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी ह भ प डॉ.रवींद्र भोळे यांचे ताटी उघडा ज्ञानेश्वरा या विषयावर प्रवचन, व ह भ प श्री संजय महाराज अलोने यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

- Advertisement -

मंदिराचे सुशोभीकरण चिरंजीव चिरायू वराडे, सचिन पाटील, श्री श्रीराम पाटील, सौ शितल नारखेडे, ललिता नारखेडे यांनी उत्स्फूर्तपणे केले. आदिशक्तीला नेसण्याची साडी लेवा संगिनी मंचच्या अध्यक्षा सौ दिपाली मनोहर नारखेडे यांचे हस्ते नेसवण्यात यावेळी किरण पाचपांडे व श्रेया देशमुख यांनी समाज जनजागृतीसाठी भारुड कार्यक्रमाचे आयोजन केले होते.कीर्तनानंतर आदिशक्तीची आरती श्री राजेंद्र जगदीश नाफडे, प्रफुल्ल भास्कर खडसे, गजानन भीमराव वराडे, अविनाश कृष्णा चौधरी, राजू हरी भारंबे, विजय पुरुषोत्तम नारखेडे, संदीप रामभाऊ पाटील, किसन ज्ञानदेव पाटील, रमेश ओंकार पाटील, तुषार माधव नारखेडे, विजय खडसे विलास चोपडे, निवृत्ती विनायक भंगाळे, उमेश रंग फिरके, मुरलीधर वासुदेव पाटील, हेमंत ओंकार पाटील, राजेंद्र विष्णू नारखेडे, वैभव झोपे, ऋषिकेश अशोक खर्चे या मान्यवरांना आरतीओवळण्याचा लाभ मिळाला. सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेया देश मुख ह्यांनी केलें. याप्रसंगी भाविक, वारकरी, भक्त ह्यांना तीर्थप्रसाद देण्याचा आला.

Adishakti Muktai

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Big News Ration Card | केंद्राचा मोठा निर्णय: 1.17...

Big News Ration Card | साक्षीदार न्यूज  | केंद्र सरकारने राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA) स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 1.17 कोटी रेशनकार्डधारकांना...

Domestic Violence | यावल येथे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार; पाच...

Domestic Violence | साक्षीदार न्यूज | यावल येथील पोलीस ठाण्यात एका महिलेने आपले पती, सासू, जेठ, जेठाणी आणि नणंद यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठी...

Electric shock | वरखेडी गावात करंट लागल्याने पाच जणांचा...

Electric shock एरंडोल | साक्षीदार न्यूज | आज सकाळी तालुक्यातील वरखेडी गावात एक हृदयद्रावक घटना घडली. गावालगतच्या म्हसावद रस्त्याजवळील शेतात कामासाठी जात असताना वीज...

RECENT NEWS