Koli Samaj रावेर | साक्षीदार न्यूज | आदिवासी कोळी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या आदिवासी कोळी शिखर बहुदेशीय संस्था, रावेर (ता. रावेर, जि. जळगाव) यांची पहिली बैठक रावेर येथील श्रद्धा सबुरी बूट हाऊस येथे उत्साहात पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मनोहर पंडीत कोळी (रा. सुलवाडी) होते.
बैठकीत संस्थेच्या स्थापनेमागील उद्दिष्टांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. आदिवासी कोळी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविणे, युवकांना संघटित करणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन उपलब्ध करून देणे तसेच समाजहितासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.
पदाधिकाऱ्यांची निवड ; संस्थेच्या कार्यासाठी पुढील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली:
अध्यक्ष : मनोहर पंडीत कोळी (रा. सुलवाडी)
उपाध्यक्ष : विनोद रामचंद्र कोळी (शिवा भाईG) (रा. पुनखेडा)
सचिव : योगेश्वर विश्वनाथ कोळी (रा. तादलवाडी)
सहसचिव : सुभाष सुकदेव सपकाळे (रा. सुनोदा)
खजिनदार : विक्की कृष्णा कोळी (रा. चोरवड)
कार्याध्यक्ष : भूषण प्रकाश तायडे (रा. रावेर)
प्रसिद्धी प्रमुख : शुभम सुनिल कोळी (रा. निबोल)
सल्लागार :
अशोक रामदास कोळी (रा. वाघोदा),
किरण सोपान कोळी (रा. अटवाडा),
संतोष वामन सपकाळे (रा. सिगत),
हरीलाल रमेश कोळी (रा. काडवेल),
गोपाळ सुधाकर कोळी (रा. खिरवड)
प्रमुख सल्लागार : विनोद रामदास कोळी (रा. नेहता)
सदस्य म्हणून संदिप तुकाराम महाले (रा. निभोरा स्टेशन), विजय देविदास कोळी (रा. अजनाड), सुपडु दोधु मोरे (रा. थोरगव्हाण), समाधान सदाशिव कोळी (रा. पातोडी), ईश्वर शालीग्राम कोळी (रा. चिनावल), विनोद मिठाराम कोळी (रा. खिडी), जयराम चिंतामण कोळी (रा. ऐनपुर), शरद सुपडु कोळी (रा. थोरगव्हाण), उमेश मोहन कोळी (रा. मागलवाडी), ज्ञानदेव पुंडलिक खवले (रा. तादलवाडी) यांच्यासह अनेक समाजबांधव उपस्थित होते.
बैठकीत समाजातील युवकांना संघटित करण्यावर, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन देण्यावर आणि समाजहितासाठी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यावर भर देण्यात आला.








