यावल ( साक्षीदार न्युज ) ; – तालुक्यातील चुंचाळे गाव शिवारातील पंचायतच्या विहिरीत पडून एका प्रौढ व्यक्तीचा दुदैवी मृत्यु झाला असून याबाबत पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे .
या संदर्भात पोलीस सुत्रांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी कि, चुंचाळे तालुका यावल येथील राहणारे विठ्ठल प्रल्हाद धनगर वय ४९ वर्ष यांचा शिवारातील यांच्या शेत विहीरीत दिनांक १६ ऑक्टोबर सोमवार रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास गाव शिवारातील ग्रामपंचायतच्या विहीरीवर पाणी भरत असतांन पाय घसरून पाण्यात बुडून दुदैवी मृत्यु झाल्याची घटना घडली असुन, याबाबत मयताचा पुतण्या किशोर अशोक धनगर यांनी यावल पोलिस ठाण्यात खबर दिल्याने अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. मयत विठ्ठल धनगर यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावलच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत जावळे यांनी केले असुन , तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे .