अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरले : हजारोंचा मृत्यू !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | १५ ऑक्टोबर २०२३ | गेल्या काही दिवसापासून अफगाणिस्तान आणि नेपाळ या देशात भूकंप आल्याने मोठे नुकसान झाले असतांना आता पुन्हा एकदा अफगाणिस्तानमध्ये मोठा भूकंप झाला आहे. या दुर्घटनेत तब्बल २ हजार लोकांचा मृत्यू झाला. तर जखमी होणाऱ्यांची संख्या देखील हजारोंच्या घरात आहे. दरम्यान अफगाणिस्तान आता परत एकदा भूकंपाने हादरले आहे.

- Advertisement -

या भूकंपाची तीव्रता ६.३ रिक्टेर स्केल नोंदवली गेली. अमेरिकेच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षण (युएसजीएस) नुसार, अफगाणिस्तानमध्ये आलेल्या भूकंपाचे केंद्र हे राजधानी हेरातपासून ३४ किलोमीटरच्या दूर आहे. जमिनीच्या ७ ते ८ किलोमीटर खोल हे केंद्र होते. हा भूकंप जागतिक वेळेनुसार, ०३.३६ वाजता आला होता. येथील नागरिकांना साधरण २० मिनिटापर्यंत भूकंपाचे धक्के जाणवत होते.

दरम्यान अफगाणिस्तानमध्ये बहुतेकवेळा शक्तीशाली भूकंप आले आहेत. परंतु अफगाणिस्तानमध्ये इतक्या प्रमाणात भूकंप का येत आहेत. याचे सर्वात मोठं कारण म्हणजे अफगाणिस्तान हे युरेशियन प्लेटच्या दक्षिणी सीमेजवळ आहे. यामुळे भूकंपाचे केंद्र स्थान अफगाणिस्तान असते. तसेच हा परिसर डोंगराळ भागाचा आहे. यामुळे येथे जास्त नुकसान होत असते.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS