साक्षीदार | ११ नोव्हेबर २०२३ | राज्याचे राजकारण गेल्या काही महिन्यापासून आंदोलने व उपोषणाने ढवळून निघाले असून आता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांची पुन्हा एकदा दिवाळीनिमित्त शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या पुण्यातील घरी हे दोन्ही नेते एकत्र आले. यावेळी सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. अजित पवार व शरद पवार यांचे यावेळी एकत्र सहकुटुंब जेवणही झाले. दरम्यान, या भेटीनंतर अजित पवार हे तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यामुळे या भेटीविषयी राजकीय वर्तुळात पुन्हा विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.
शरद पवारांची भेट घेतल्यानंतर अजित पवार तातडीने दिल्लीला रवाना झाल्याने राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. तसेच, अजितदादा काही दिवसांपासून नाराज असल्याच्या चर्चांनाही पुन्हा जोर आला आहे. दरम्यान, या भेटीनंतर अजित पवार हे तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. अजित पवार गटाची आज दिल्लीत बैठक आहे. तसेच, अजित पवार आज सायंकाळी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचीही माहिती आहे. या भेटीमागचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र, शरद पवारांच्या भेटीनंतर अजित पवार तातडीने दिल्लीला रवाना झाल्याने याबाबत राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा रंगली आहे. दुसरीकडे, मराठा आरक्षण आंदोलनाच्या हाताळणीवरुन अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा आहेत. तसेच, अजित पवारांच्या तातडीच्या दिल्ली दौऱ्यामुळे मुख्यमंत्री बदलाची चर्चाही पुन्हा सुरू झाली आहे.