सहा दशकानंतर जळगाव शहरातून महिला प्रमुख उमेदवार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव ( सुनिल भोळे ) : – आताचा जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ आणि पूर्वीचा जळगाव विधानसभा मतदारसंघाचा इतिहास तपासला असता १६६२च्या विधानसभा निवडणुकीत जळगाव शहरातून काँग्रेस पक्षाने प्रतिभाताई पाटील यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी त्या निवडून आल्या होत्या. पुढे त्या देशाच्या राष्ट्रपतीपदावर विराजमान झाल्या.

- Advertisement -

 

 

- Advertisement -

सन १९६२ नंतर एखाद्या प्रमुख पक्षाने जळगावातून एका महिलेला उमेदवारी देण्यासाठी २०२४ हे वर्ष उजाडले आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीअंतर्गत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने माजी महापौर सौ. जयश्री सुनिल महाजन यांना उमेदवारी दिली आहे. मध्यंतरीच्या काळात अनेक स्थित्यंतरे झालीत. शरद पवार मुख्यमंत्री असतांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांसाठी ३३% जागा राखीव केल्या गेल्या नंतर विलासराव देशमुखांच्या काळात हेच आरक्षण ५० टक्क्यांवर गेले. मात्र विधीमंडळ व संसदीय पटलावर अजूनही महिला वर्ग तसा उपेक्षीतच राहीला आहे. नाही म्हणायला गेल्या केंद्रसरकारच्या काळात महिला आरक्षण विधेयक पारीत करण्यात आले, परंतू आरक्षण कधीपासून अस्तित्वात येईल? याची निश्चिती नाही.

सहा दशकांनंतर एखाद्या प्रमुख पक्षाने जळगावातून एका महिलेला उमेदवारी दिली आहे. मिळालेल्या या संधीचे स्वागत शहरातील महिला वर्ग कशा पद्धतीने करतो? याची राजकीय जाणकारांना उत्सुकता आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sand Mafia | जळगाव जिल्ह्यात अवैध वाळूच्या डंपरने घेतला...

Sand Mafia जळगांव | सुनिल भोळे | जिल्ह्यात वाळू चोरी थांबण्याचे नाव घेत नाही .साक्षीदार न्यूजने तालुका पोलीस स्टेशनचे रामकृष्ण इंगळे यांचा वाळू चोरी...

Kingaon PHC | किनगावात गरोदर मातांच्या जीवाशी खेळ; एकाच...

Kingaon PHC किनगाव | मिलिंद जंजाळे | एकीकडे सरकार 'सुरक्षित मातृत्व' आणि 'डिजिटल इंडिया'च्या गप्पा मारत असताना, जळगाव जिल्ह्यातील किनगाव येथे मात्र मानवतेला काळिमा...

Jalgaon Banana Price | केळी दरात मोठी घसरण! जळगावातील...

Jalgaon Banana Price जळगाव | मिलिंद जंजाळे | जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी सध्या गंभीर आर्थिक अडचणीत सापडले असून, बाजारात मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे नाराजी वाढत...

RECENT NEWS