उमरगा (साक्षीदार न्युज ) ; – तालुक्यातील रामपुर येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, उमरगा तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर रितापूरे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सहायक एस. एस. सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत व ग्रामस्थांच्या श्रमदानातून उपसरपंच संतोष भोसले कृषी मित्र विष्णु भोसले यांनी आज दि.१३ डिसेंबर रोजी वनराई बंधाऱ्याची उभारणी केली.
मागील काही काळापासून कृषी विभागाच्या वतीने वनराई बंधाऱ्याची संकल्पना राबवण्यात आली होती. या योजनेमध्ये पाणी आडवा पाणी जिरवा तसेच या वनराई बंधाऱ्यामुळे पाणी अडवले जाणार असून शेतकऱ्यांना सिंचन स्त्रोताचा फायदा होणार आहे. रामपुर येथील शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी येथे श्रमदानातून वनराई बंधारे उभारणी काम सुरू केली आहे.
यावेळी मार्गदर्शक एस. एस. सुर्यवंशी कृषीसहाय्यक गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित उपसरपंच संतोष भोसले, सदस्य अनंत भोसले, अल्लाउद्दीन तांबोळी, नितीन सुरवसे, जालींदर भोसले, कृषीमित्र विष्णू भोसले , दत्ता भोसले, लक्ष्मण भोसले ,अर्जुन चव्हाण, कैलास कोळी, किरण भोसले ,बाबा पांढरे मोहन, धुळे राम ,कोराळे नितीन कांबळे शेतकरी उपस्थित होते.