Ajit Pawar | ‘अजितदादा परतणार?’ संजय राऊतांचा सकाळीच राजकीय बॉम्ब; महाविकास आघाडीत मोठी उलथापालथ होणार का?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Ajit Pawar | साक्षीदार न्यूज | राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या हालचालींना वेग आला असून, शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्या एका वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट अनेक ठिकाणी एकत्र दिसल्यानंतर राऊत यांनी थेट दावा करत “भविष्यात शरद पवार आणि अजित पवार हे दोघेही महाविकास आघाडीत एकत्र दिसतील”, अशी भविष्यवाणी केली आहे.

- Advertisement -

काही काळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार महायुतीत सहभागी झाले. मात्र, अलीकडील महापालिका निवडणुकांमध्ये पुणे, पिंपरीसह अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी गटांनी समन्वय साधल्याचे चित्र दिसून आले. याच पार्श्वभूमीवर, “शरद पवार महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का?” असा सवाल राऊत यांना विचारण्यात आला होता.

मात्र, या प्रश्नाला थेट उत्तर देण्याऐवजी राऊत यांनी उलट सवाल करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली. “शरद पवार बाहेर पडतील असा विचार का करता? उलट अजित पवारच शरद पवारांसोबत महाविकास आघाडीत येतील असा विचार का करत नाही?” असा टोला त्यांनी लगावला. त्यांच्या मते, अजित पवारांचे मन अजूनही कुटुंबाकडे असून, अखेरीस ते महायुती सोडून महाविकास आघाडी मध्ये परत येऊ शकतात.

- Advertisement -

या मुद्द्यावर अधिक बोलताना राऊत म्हणाले की, “शरद पवार आमच्यासोबत आहेत, त्यांचा पक्ष महाविकास आघाडीत आहे. अजित पवारांचा पक्ष युतीत असला तरी दोन दगडांवर पाय ठेवता येत नाही. कधीतरी एक निर्णय घ्यावाच लागतो.” त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

दरम्यान, सिंचन घोटाळ्याच्या मुद्द्यावर भाजपकडून वारंवार उपस्थित होणाऱ्या आरोपांवर राऊत यांनी उपरोधिक शैलीत प्रत्युत्तर दिले. “मेलं मेंढरू आगीला भीत नाही,” असे म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला. “एकदा क्लीनचिट दिल्यानंतर आता कोणत्या तोंडाने डरकाळ्या फोडता?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

याचवेळी छगन भुजबळ प्रकरणाचा उल्लेख करत राऊत म्हणाले की, “अडीच वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर ते निर्दोष ठरले. यावर संबंधित यंत्रणांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.” सत्ता असताना अनेक नेते भाजपसोबत असतात, मात्र सत्ता बदलली की राजकीय भूमिकाही बदलतात, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.

संजय राऊतांच्या या वक्तव्यामुळे अजित पवारांच्या राजकीय भूमिकेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आगामी काळात राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

उमेदवार,महिला,कार्यकर्ते यांयाच्यावर पोलिसांचा जोरदार लाठीमार

मतदान केंद्रावर पोलिस आणि उमेदवारासह कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राढा 

जळगांव मतदान केंद्रावर मतदाराचे ब्रेन वॉश ?

Ajit Pawar

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Kingaon PHC | किनगावात गरोदर मातांच्या जीवाशी खेळ; एकाच...

Kingaon PHC किनगाव | मिलिंद जंजाळे | एकीकडे सरकार 'सुरक्षित मातृत्व' आणि 'डिजिटल इंडिया'च्या गप्पा मारत असताना, जळगाव जिल्ह्यातील किनगाव येथे मात्र मानवतेला काळिमा...

Jalgaon Banana Price | केळी दरात मोठी घसरण! जळगावातील...

Jalgaon Banana Price जळगाव | मिलिंद जंजाळे | जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी सध्या गंभीर आर्थिक अडचणीत सापडले असून, बाजारात मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे नाराजी वाढत...

Rural Hospital Issue | किनगावमध्ये आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा! पीएम...

Rural Hospital Issue यावल | मिलिंद जंजाळे | तालुक्यातील किनगाव येथे आरोग्य व्यवस्थेची गंभीर अवस्था समोर आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात जागेअभावी रुग्णांची तपासणी...

RECENT NEWS