साक्षीदार | १२ ऑक्टोबर २०२३ | राज्यातील सरकारमध्ये आलेल्या तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते आपल्याच पक्षातील नेता मुख्यमंत्री असावा अशा नेहमीच चर्चा होत असतांना आता अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत विधान केलं आहे.
- Advertisement -
अजित पवार म्हणाले की, देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले तरी आम्हाला वाईट वाटण्याचं काहीच कारण नाहीये. ”बावनकुळे यांनी काय बोलावं, हा त्यांचा अधिकार आहे. शेवटी जनताच निर्णय घेत असते. आम्हाला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री झालं तर वाईट वाटण्याचं कारण नाही” असं अजित पवार म्हणाले. या विधानामुळे खरंच देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाला पवारांचं समर्थन आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
- Advertisement -