उमरगा तालुक्यातील सर्व कृषी सहायकाना आवरा ! रयत क्रांतीची मागणी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

गावात व कामाच्या जागी कधीच थांबत नाहीत; जिल्हाध्यक्ष सुरज आबाचने

- Advertisement -

उमरगा । साक्षीदार न्युज । उमरगा तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर रितापूरे यांना रयत क्रांती पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरज आबाचने यांनी निवेदन दिले, यावेळी तालुक्यातील कृषी सहायक यांच्या बद्दल दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की गाव तिथे कृषी सहायक सज्जा अशी शासनाची संकल्पना आहे, मात्र शासनाच्या या संकल्पनेला उमरगा तालुक्यातील मध्ये हरताळ फासला जात असल्याचे दिसते. सध्या तालुक्यातील अनेक गावचे कृषी सहायक इतके सुसाट सुटले आहेत की ते जागेवर गावात कधीच थांबताना दिसत नाहीत, त्यांच्यामुळे शेतकऱ्यासह अनेकांची कामे नेहमीच अडलेली दिसत आहेत.

अत्यंत महत्त्वाचा असलेला आणि प्रशासनासाठी दुवा ठरलेला कृषी सहायक वर्ग सध्या कुठल्याच गावामध्ये इमानदारीने आपले कर्तव्य बजावताना दिसत नाही. गाव तिथे सध्या ही संकल्पना जरी असली तरी यामध्ये उमरगा तालुक्यात प्रचंड मोठा खंड पडल्याचे दिसते. गाव तिथे कृषी सहायक नेमले गेले असले तरी या ठिकाणी कृषी सहायक उपस्थित राहत नाहीत त्यांनी त्यांचे माणसं त्या ठिकाणी कामाला ठेवलेली आहेत. कृषी सहायक स्वतः मात्र तालुक्याच्या ठिकाणीच थांबायला धन्यवाद मानतात. गाव पातळीवरची कामे आणि शेतकऱ्यांच्या सगळ्या नोंदी कृषी सहायक यांच्याकडे असल्यामुळे प्रशासनासाठी ते सोयीचे ठरते. शेतसारापासून इतर जे महत्त्वाची कागदपत्रे नोंदी, सव्हें, पाहणी तसेच शेतीतील पेरणी, मशागती, फवारणी व उत्पन्न वाढीबाबत मार्गदर्शन करणे या सगळ्या बाबतीत कृषी सहायक महत्त्वाचा ठरतो. नेमून दिलेले गाव म्हणजे त्यांच्यासाठी त्यांना सजा वाटते की काय अशी परिस्थिती आहे. काही कृषी सहायक हे तालुक्यांचा ठिकाणी पांढरे कपडे घालून हिंडताना दिसतात. शेतकऱ्यांची आणि गावातील शेतकरी व ग्रामस्थांनी देखील गावातील कृषी सहायक बदल नाराजी व्यक्त केली आहे .

- Advertisement -

याबाबत तालुका कृषी अधिकारी यांनी कर्मचाऱ्याना समज देऊन आपले कर्तव्य योग्य रितीने बजावण्याच्या सुचना कराव्यात अशी मागणी रयत क्रांती पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरज आबाचने यांनी केले आहे. येत्या १५ दिवसांत याची अंमलबजावणी नाही झाल्यास तालुका कृषी कार्यालयात आंदोलन केले जाईल अशा इशाराही जिल्हाध्यक्ष सुरज आबाचने यांनी दिला आहे .

 

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS