जळगाव शहराचा सर्वांगीण विकास करणे हेच माझे प्राधान्य – जयश्रीताई महाजन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

जळगाव (सुनील भोळे ) : – शहराच्या सर्वांगीण विकासाला प्रथम प्राधान्य देऊन शहरातील समस्यांचे निवारण करण्याचे वचन महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री महाजन यांनी दिले आहे. आज (दि.९) सकाळच्या सत्रात जयश्री महाजन यांनी आपला प्रचार प्रभाग क्रमांक १२ मध्ये प्रभात चौकातील दक्षिण मुखी हनुमानाचे दर्शन घेऊन व आपल्या शहराच्या सर्वांगिण विकासाला, तरुणांना इथेच रोजगार मिळवून द्यायला तसेच जळगावकर नागरिकांना सुरक्षित रस्ते मिळवून देण्यासाठी सुरु केलेल्या कार्याला बळ देण्याचे आवाहन केले.

- Advertisement -

Jalgaon city is my priority

यावेळी शहरातील प्रभाग क्रमांक १२ मधील एम.जे.कॉलेज परिसर, विठ्ठल रुख्मिणी मंदीर, लाठिज परिसर, दक्षिणमुखी हनुमान मंदीर, हिरकणी ब्यूटी पार्लर, रामदास कॉलनी, ओंकारेश्वर मंदिर परिसर, सेंट जोसेफ हायस्कूल परिसर, साईबाबा मंदीर, गुलमोहर कॉलनी, लक्ष्मीनगर, पोस्टल कॉलनी, महादेव मंदीर, वल्लभनगर, धांडेनगर, फोर स्टार रेसिडेन्सी, धांडे नगर, गोदावरी चक्की, दत्तमंदीर, विवेकानंद नगर या मार्गे जावून अनुराधा रेसिडेन्सी येथे प्रचार रॅलीचा समारोप झाला. या प्रचार रॅली दरम्यान त्यांचे परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत करत, जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात यंदा परिवर्तन घडविण्याचा निर्धार व्यक्त केला.

- Advertisement -

Jalgaon city is my priority

या प्रचार फेरीदरम्यान ठिकठिकाणी जयश्री महाजन यांनी परिसरातील नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी बोलतांना त्यांनी जळगावकरांना उद्देशून सांगितले की, “आपल्या शहराचे नाव सोन्याच्या शुद्धतेसाठी प्रसिद्ध आहे. जगभरातून शुध्द सोने घ्यायला आपल्याकडे लोक येतात. मात्र सध्या शहराचा विकास अनेक समस्यांच्या काजळीने झाकोळला आहे. ही काजळी दूर करण्यासाठी आणि शहराला पुन्हा सोन्यासारखीच चकाकी देण्यासाठी तुमचा आशीर्वाद मतांच्या रूपाने पदरी पडावा. तुमच्या साथीने जळगावला निश्चितच आम्ही सर्वांगीण विकासाच्या वाटेवर पुढे नेईल.”
या प्रचार फेरीत शिवसेनेचे महानगर प्रमुख शरद आबा तायडे, उपमहानगर प्रमुख मानसिंग सोनवणे, महिला आघाडी महानगर प्रमुख मनीषा पाटील, उपमहानगर प्रमुख जया तिवारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, सुनील माळी, प्रकाश पाटील, सलीम खाटीक, पिंटू तायडे, किरण भावसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर युवक महानगराध्यक्ष रिंकू चौधरी, रहीम तडवी, पूनम राजपूत, प्रमोदभाऊ झंवर, ओगल पांचाळ, संजू महाजन, इंद्रसेन पारेख, देविदास पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Jalgaon city is my priority
प्रभाग क्रमांक १२ मध्ये झालेल्या या रॅलीने जयश्री महाजन यांच्या प्रचाराला जोरदार चालना मिळाली असून जळगाव शहराच्या विकासासाठी जयश्री महाजन यांनी ठिकठिकाणी लावलेल्या होर्डिंगमधून जाहीर केलेले मुद्दे आणि मांडलेले जळगावकरांचे प्रश्नांकडे नागरिक आकर्षित होत असून, या होर्डिंगची चर्चा सर्वत्र रंगत आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

RECENT NEWS