आपल्याले फक्त राजूमामाच पाहिजे… तो आपला खरा बाप्पा आहे…

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

छत्रपती शिवाजीनगर परिसरातील ज्येष्ठांच्या प्रतिक्रियांनी भारावले आमदार राजूमामा, प्रचारात आघाडी

- Advertisement -

जळगाव (सुनील भोळे) : – शहर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांच्यावर छत्रपती शिवाजीनगर परिसरातील दालफळ, हुडको, धनाजी काळे नगर आदी भागांमध्ये नागरिकांनी रांगोळ्या काढून फुलांचा वर्षाव करीत पुष्पहार घालत हार्दिक स्वागत केले. नागरिकांचे हे प्रेम पाहून मला माझ्या कामाची पावती मिळाली, अशी भावपूर्ण प्रतिक्रिया आ. राजूमामा उर्फ सुरेश भोळे यांनी व्यक्त केली.

Rajumama

- Advertisement -

आ. राजूमामा भोळे यांनी रविवारी दि. १० रोजी सकाळी छत्रपती शिवाजीनगर येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिर येथे पूजा करून प्रचार दौरा सुरू केला. तेथून अमर चौक परिसर, दालफळ, शिव मंदिर परिसर, हुडको, बौद्ध विहार परिसर, संभाजी चौक परिसर, मिर्झा चौक, धनाजी काळे नगर, पटेलवाडी, क्रांती चौक मार्गे महादेव मंदिर येथे रॅली मार्गाचा समारोप झाला. रॅली मार्गात ठिकठिकाणी महिला भगिनींनी आणि नागरिकांनी सतत फुलांचा वर्षाव करून आ. राजूमामा गोळे यांना पुष्पहार घालत औक्षण देखील केले.

मार्गातील विविध मंदिरांसह बौद्ध विहार येथे जाऊन आ. राजूमामा भोळे यांनी दर्शन घेतले. प्रचार मार्गामध्ये एका जेष्ठ भगिनीने, ‘आपल्याले फक्त राजूमामाच पाहिजे… तो आपला खरा बाप्पा (खरा माणूस)आहे…अजून विकास करजो…’ अशा ज्येष्ठांच्या प्रतिक्रियांनी आ. राजूमामा भोळे भारावले.

रॅलीत महानगर जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे, मंडळ क्रमांक १ चे अध्यक्ष संजय शिंदे, माजी नगरसेवक राजू मराठे, नवनाथ दारकुंडे, शिवसेनेचे एड.दिलीप पोकळे, अमोल सांगोरे, भरत कर्डिले, सुभाष शौचे, दिनेश पुरोहित, अमजद खान पठाण, आनंद सपकाळे, संगीता पाटील, विनय चौधरी, हरीश तेली, विजय जगताप, जहांगीर खान, उमेश देशपांडे, वासिम शेख, प्रल्हाद सोनवणे, रितेश जाधव, विनय निंबाळकर, निशिकांत पाटील, कोकिळाताई पाटील, संजय सोनवणे, अनिल साठे, महेश पाटील, कल्पेश सोनवणे, मिलिंद सपकाळे, सागर पाटील, महिला मोर्चा अध्यक्ष यामिनी सोनवणे, सरचिटणीस तारा पटेल, कविता इंगळे, लता बाविस्कर, शुभांगी बिऱ्हाडे, रेखा कुलकर्णी, गायत्री शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विनोद देशमुख, योगेश कदम, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मिलिंद सोनवणे, अविनाश पारधे, लोक जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक सपकाळे, जिल्हाध्यक्ष अशोक पारधे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

Heart Attack | धक्कादायक! धावत्या दुचाकीवरच तरुणाचा मृत्यू; हृदयविकाराचा...

Heart Attack यावल | मिलिंद जंजाळे | यावल शहरातील अंकलेश्वर–बऱ्हाणपूर राज्य मार्गावरील चोपडा नाक्याजवळ एका ३२ वर्षीय तरुणाचा धावत्या दुचाकीवर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने...

RECENT NEWS