High Court News साक्षीदार न्युज । अलाहाबाद हायकोर्टाने पालकांच्या संमतीशिवाय किंवा त्यांच्या इच्छेविरोधात लग्न करणाऱ्या जोडप्यांबाबत महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. अशा जोडप्यांना पोलिस संरक्षणाचा हक्क मागण्याचा अधिकार नाही, जोपर्यंत त्यांच्या जीविताला किंवा स्वातंत्र्याला स्पष्ट धोका असल्याचे सिद्ध होत नाही, असे कोर्टाने स्पष्ट केले आहे.
न्यायाधीश सौरभ श्रीवास्तव यांच्या खंडपीठाने हा निर्णय देताना एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान हे निरीक्षण नोंदवले. श्रेया केसरवाणी आणि त्यांच्या पतीने दाखल केलेल्या याचिकेत पोलिस संरक्षणाची मागणी करण्यात आली होती. तसेच, त्यांच्या वैवाहिक जीवनात कोणत्याही प्रकारची ढवळाढवळ न करण्याचे आदेश देण्याची विनंतीही कोर्टाला केली होती. मात्र, कोर्टाने याचिकाकर्त्यांच्या जीविताला कोणताही धोका नसल्याचे नमूद करत ही याचिका फेटाळली.
कोर्टाने आपल्या निकालात म्हटले की, पालकांच्या इच्छेविरोधात पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना संरक्षण देण्यासाठी न्यायालये नाहीत. सुप्रीम कोर्टाच्या एका निकालाचा हवाला देत हायकोर्टाने असे स्पष्ट केले की, जोपर्यंत जीविताला धोका असल्याचा ठोस पुरावा सादर होत नाही, तोपर्यंत पोलिस संरक्षणाचे आदेश दिले जाणार नाहीत.
या प्रकरणात याचिकाकर्त्यांनी कोणताही धोका असल्याचे सिद्ध न केल्याने कोर्टाने संरक्षण देण्यास नकार दिला. तसेच, अशा जोडप्यांनी समाजाला सामोरे जाण्यासाठी एकमेकांचा आधार घ्यावा, असेही कोर्टाने नमूद केले. हा निकाल अशा जोडप्यांसाठी महत्त्वाचा ठरू शकतो, जे पालकांच्या विरोधात लग्न करतात आणि संरक्षणाची मागणी करतात.
पतीचा अघोरी कृत्याचा किळसवाणा प्रकार ! हळदी-कुंकवाचे लिंबू पिळून पत्नीला दिली धमकी
आईनेच स्वत:च्याच मुलीचा अश्लील व्हिडिओ काढून प्रियकराला पाठवला