साक्षीदार | ३ नोव्हेबर २०२३ | राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर आंदोलने सुरु होते. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी नुकतेच दि.२ रोजी उपोषण मागे जरी घेतले असले तरी मात्र राज्यातील विविध भागातील मराठा बांधव आपल्या आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. नाशिक, पंढरपुरमध्ये मराठा बांधवांनी आजही आरक्षणाच्या मागणीसाठी रास्ता रोको केला.
- Advertisement -
मनोज जरांगे पाटील यांनी जरी आंदोलन मागे घेतले असले तरी संतप्त मराठा बांधवांकडून आंदोलन केले जात आहे. नाशिकमधील मराठा बांधवांनी आक्रमक भूमिका घेत मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको केला. या रास्ता रोकोमुळे महामार्गावरील वाहतुकही काही काळ ठप्प झाली.
- Advertisement -