साक्षीदार | २२ ऑक्टोबर २०२३ | शेती करण्यासाठी मूळ वासरे गावी गेलेल्या एकाच्या बंद घराचा दरवाजा तोडून चोरट्याने पावणे सात लाखांचा ऐवज लांबवल्याची घटना दि २० रोजी सकाळी सहा वाजता आर. के. नगर भागात उघडकीस आली. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरातील आर. के. नगर परिसरातील रहिवासी भटू दौलत पाटील हे अधूनमधून शेती करण्यासाठी आपल्या मूळ वासरे या गावी जातात. दिनांक १५ पासून ते वासरे येथे गेले होते. २० रोजी सकाळी शेजाऱ्याने फोन करून सांगितले की घराचे कुलूप तोडलेले आहे. त्यांनी अमळनेर येऊन पाहिले असता घरातील लॉकर व कपटाचे कुलुपही तोडलेले दिसले घरातील ७५ तोळे सोन्याचे दागिने आणि ४ लाख ७० हजार रुपये रोख असा एकूण ६ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे. अमळनेर पोलिस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक विजय शिंदे करीत आहेत.