साक्षीदार | १० ऑक्टोबर २०२३ | राज्यातील अनेक जिल्ह्यात अपघाताची मालिका सुरु असतांना पोलीस विभागातून एक अपघाताची बातमी समोर आली आहे. पोलिसांच्या निर्भया पथकाच्या वाहनाचा अपघात झाला असून यात तीन पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहे. हि घटना सांगलीतील मिरज तालुक्यातून समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील बेडग गावातील शाळांची तपासणी करून निर्भया पथकाचे पोलीस मिरजकडे जात होते. त्यावेळी एक दुचाकीस्वार आडवा आला, त्यावेळी बचाव करताना पोलीसांचं वाहन चालविणाऱ्या चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं. या अपघातात पोलीसाचं वाहन उलटल्याची घटना घडली आहे.
बेडग ते आडवा रस्त्यावरून चारचाकी वाहनाने निर्भया पथकाचे पोलीस मिरजकडे चालले होते. त्यावेळी एक दुचाकीस्वार आडवा आला. त्यावेळी पोलीस वाहन चालकाचा ताबा गाडीवरून सुटला. त्यानंतर निर्भया पथकाचं वाहन शेताच्या कडले उलटलं. या अपघातात निर्भया पथकातील एएसआय संभाजी धेंडे, अजित कोळेकर, इरवंत येमलवाड जखमी झाले. तर या अपघातात दुचाकीस्वार महादेव रायप्पा देखील गंभीर जखमी झाला. त्याच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अपघातस्थळी दारूच्या बाटल्या आढळल्या आहेत. त्यामुळे दुचाकीस्वार मद्य प्राशन करून गाडी चालवत असल्याने अपघात झाला का, असा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.