साक्षीदार | ४ नोव्हेबर २०२३ | राज्यात गेल्या काही महिन्यापासून ललित पाटील प्रकरण चर्चेत असताना आता राज्यातील अनेक ठिकाणी अंमली पदार्थांप्रकरणी मोठ्या कारवाया सुरू असून सापांच्या विषाची तस्करी प्रकरणात एल्विश यादवचं नाव समोर आलंय. या सर्वांवरून खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर जोरदार हल्लाबोल केलाय. तसेच शिंदेंच्या गटातील एक खासदार देखील ड्रग्स घेतो असा खळबळजनक दावा संजय राऊतांनी केला आहे.
सापाच्या विषाची तस्करी करणारा, रेव्ह पार्टीत सापाच्या विषातून तयार होणाऱ्या अंमली पदार्थाची तस्करी कराणारा एल्विश वर्षा बंगल्यावर गेला होता. तिथे एखाद्या सुपर हिरो सारखं त्याचं स्वागत केलं गेलं. त्याला मिठ्या मारल्या गेल्या. त्यानंतर शिंदेंच्या गटातील एका खासदाराने त्याला आपल्या घरी नेलं. सदर खासदार स्वत: अंमली पदार्थांचे सेवन करत आहे. याबाबत माझ्याकडे पक्की माहिती असल्याचा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केलाय.








